S M L

VIDEO : जेव्हा सलमानचा डान्स पाहून फराह खान सेट सोडून निघून जाते

फराह खान आण शिल्पा शेट्टी यांनीही या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी दोघींनी सलमानची बरीच गुपितं बाहेर आणली.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2018 10:42 AM IST

VIDEO : जेव्हा सलमानचा डान्स पाहून फराह खान सेट सोडून निघून जाते

मुंबई, 29 जुलै : सलमान खानच्या 'दस का दम' या शोचा टीआरपी भले कितीही मागे असू देत, पण त्याच्या शोमध्ये बाॅलिवूड कलाकार आले की खूप चर्चा सुरू होत. आता हेच बघा ना अनिल कपूर या शोमध्ये आला काय आणि त्यानं ऐश्वर्या राय बच्चनचं नाव घेतलं काय, शो एकदम हिट. तसंच फराह खान आण शिल्पा शेट्टी यांनीही या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी दोघींनी सलमानची बरीच गुपितं बाहेर आणली. सलमानला इंग्लिश बोलणाऱ्या मुली पसंत असतात, असा टोमणाही शिल्पानं मारला.


#duskadum Shilpa Unbuttons Salman Khan 😅😄😎😉 FOLLOW @INSTABOLLYWOOD.FC #bollywood #shahrukhkhan #salmankhan #bollywoodactress #katrinakaif #priyankachopra #bollywoodfaroshion #varundhawan #aliabhatt #sonamkapoorkishaadi #kingkhan #bollywoodstyle #asian_dramaland #akshaykumar #jacquelinefernandez #instadrworld #shraddhakapoor #indian #kajol #sonakshisinha #tigershroff #instabollywoodfc

A post shared by insta bollywood.fc (@instabollywood.fc) on

Loading...
Loading...

तर महत्त्वाचं म्हणजे या शोमध्ये आणखी एक राज समोर आलंय. ते म्हणजे सलमानचा डान्स पाहून फराह खाननं सेटवरून पळ काढला होता. त्याचं झालं काय, मैने प्यार किया सिनेमाच्या वेळी सलमान खान स्क्रीन टेस्ट द्यायला आला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्यावेळी बाॅलिवूडचा हा दबंग खान डान्स करायला चक्क घाबरत होता की हो. त्याला वाटलं फराह आपल्याला सांभाळून घेईल. एक-दोन स्टेप्स सांगेल. कसलं काय, सलमानचा डान्स पाहून फराह तडक निघूनच गेली. आणि सल्लूमियाँला सगळं झाल्यावर हे समजलं. अर्थात, मैने प्यार किया सुपरडुपर हिट ठरला, हे वेगळं सांगायची गरज नाही.

फराह खान आणि सलमान खान यांच्यात चांगली मैत्री आहे. खरं तर फराहनं शाहरूखसाठी सिनेमे काढले. ते हिटही झाले. तरी सलमान आणि फराहच्या मैत्रीत काही फरक पडला नाही. सल्लूमियाँ आजही फराह खानचा खूप आदर करतायत. दस का दममध्ये सगळ्यांनीच खूप एंजाॅय केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 10:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close