मुंबई, 21 जानेवारी : भारताची जागतिक सुंदरी मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. 2017 साली मानुषीने मिस वर्ल्ड पुरस्कार पटकावल्यानंतर जगभरात मानुषीच्या सुंदरतेची चर्चा होऊ लागली.
मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मानुषीनेदेखील याबाबत एका अॅवॉर्ड कार्यक्रमात म्हटलं होतं की, ती बॉलिवूडमध्ये येण्याच्या विचारात आहे. मानुषीच्या आधी ऐश्वर्या राय बच्चन, सुष्मिता सेन, प्रियांका चौप्रा यांनी ब्युटी क्वीन असे पुरस्कार मिळवले आहेत आणि पुरस्कारानंतर या अभिनेत्रींनी चित्रपटात काम केलं आहे.
मानुषी छिल्लरला लाँच करण्यावरून माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागली होती. दिग्दर्शक फराह खान मानुषीला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता याबाबत फराह खानच्या जवळच्या सुत्रांनी माहिती दिली आहे की, 'फराह आणि मानुषी यांची भेट झाली हे खर आहे. पण त्यांच्याविषयीचं बाकी सगळं भाकित खोटं आहे' यावरून फराह खान मानुषीला लाँच करणार नाही हे मात्र निश्चित आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोणला फराह खानने 'ओम शांती ओम' या सिनेमातून लाँच केलं होतं. शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या दीपिकाने या सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये चार चाँद लावले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा