Home /News /entertainment /

'तारे जमीन पर' फेम दर्शीलचा VIDEO पाहून चाहते भावुक,केलं मोठं आवाहन

'तारे जमीन पर' फेम दर्शीलचा VIDEO पाहून चाहते भावुक,केलं मोठं आवाहन

बॉलिवूड परफेक्शनिस्ट (Bollywood Perfectionist) आमिर खानचा (Aamir Khan) 2007 मध्ये आलेला 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) हा चित्रपट सर्वानांच आठवतो. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. चित्रपटाचा आगळावेगळा विषय सर्वानांच भावला होता. या चित्रपटात आमिरसोबतच एक बालकलाकार प्रचंड चर्चेत आला होता. तो चिमुकला होता दर्शील सफारी (Darsheel Safary).

पुढे वाचा ...
  मुंबई,10 मे-   बॉलिवूड परफेक्शनिस्ट  (Bollywood Perfectionist)  आमिर खानचा   (Aamir Khan)  2007 मध्ये आलेला 'तारे जमीन पर'  (Taare Zameen Par)  हा चित्रपट सर्वानांच आठवतो. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. चित्रपटाचा आगळावेगळा विषय सर्वानांच भावला होता. या चित्रपटात आमिरसोबतच एक बालकलाकार प्रचंड चर्चेत आला होता. तो चिमुकला होता दर्शील सफारी (Darsheel Safary). या चित्रपटात त्याने ईशानची भूमिका साकारली होती. त्याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. आज तो चिमुकला तब्बल 25 वर्षांचा आहे. नेटफ्लिक्सच्या 'मदर्स डे स्पेशल' व्हिडिओमुळे (Mothre's Day Special Video) तो पुन्हा प्रसिद्धीत आला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपट आणि कार्यक्रमांची झलक आहे जी आई-मुलाच्या नातेसंबंधाबद्दल सांगते.हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक भावुक झाले आहेत. दर्शीलच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. तसेच त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहून चाहते फारच आनंदी आहेत. 'तारे जमीन पर' मधील 'मैं कभी बतलाता नहीं' या प्रसिद्ध गाण्यातील एका ओळीने दर्शीलने आपल्या व्हिडीओची सुरुवात केली. व्हिडिओच्या सुरुवातीलाच दर्शील म्हणतो, 'मी कधीच सांगत नाही, पण आज मी तुम्हाला आईबद्दलच्या काही न कळालेल्या गोष्टी सांगू? आई आपल्या मुलांच्या समस्या न बोलता कशा समजून घेते, आणि कदाचित आपल्या घरी बनवलेल्या जेवणाने त्यांचं निराकरण करण्याचा प्रेमळ प्रयत्न करते'. तसेच दर्शील म्हणतो की, 'माता आपल्या मुलांना कशा प्रकारे समजून घेतात आणि त्यांच्यासाठी एकट्या जगाशी लढू शकतात. आईला 'सुपरवूमेन' म्हणत तो आपल्या कवितेचा शेवट करतो. नेटफ्लिक्सने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'आम्हाला शाळेच्या बसमध्ये सोडण्यापासून ते 17 मिस्ड कॉलपर्यंत आमचं मन उदास होतं. आणि आम्हाला चमचे कसे वापरायचे ते शिकवले जाते. आईला खरंच या सगळ्या गोष्टी माहीत आहेत! खऱ्या सुपरहिरोला मदर्स डेच्या शुभेच्छा'. असं म्हणत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जी लोकांना प्रचंड पसंत पडत आहे.महत्वाचं म्हणजे एका चाहत्याने नेटफ्लिक्सला दर्शीलला वेब सीरिजमध्ये काम देण्याची विनंती केली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Netflix India (@netflix_in)

  'तारे जमीन पर' मधून बालकलाकार म्हणून सुरुवात करणाऱ्या दर्शील सफारीने नंतर 'बम बम बोले', 'जोक्कोमन' आणि 'मिडनाइट्स चिल्ड्रन' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 मध्ये 'झलक दिखला जा 5' मध्येही तो सहभागी झाला होता.त्यांनतर मात्र चाहते त्याला पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या