VIDEO VIRAL रस्त्यावरच्या भांडणात सापडला Big Boss विजेता अभिनेता; वाद सोडवायला गेला आणि...

VIDEO VIRAL रस्त्यावरच्या भांडणात सापडला Big Boss विजेता अभिनेता; वाद सोडवायला गेला आणि...

Big Boss चा विजेता असलेला हा अभिनेता चक्क रस्त्यावरचं भांडण सोडवताना दिसला. त्याचा हा VIDEO एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : 'बालिका वधू' (Balika vadhu) फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) हा टीव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. बिग बॉस (Big boss 13) सीझन 13 चं विजेतेपद मिळवल्यानंतर त्याच्या 'फॅन क्लब'मध्ये अजूनच वाढ झाली. त्याचे चाहते सतत कुठल्या न कुठल्या कारणानं त्याचं कौतुक करताना दिसतात. आताही सिद्धार्थचा असाच एक व्हिडीओ समोर आलाय.

सिद्धार्थ या व्हिडिओत चक्क रस्त्यावरचं भांडण सोडवताना दिसतोय. दोन गटांमधल्या भांडणात मध्यस्थी करतानाचा हा व्हिडिओ साक्षी नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विटरवर शेअर केला आहे.

यात सुरवातीला सिद्धार्थ आपल्या गाडीतून उतरताना दिसतो. उतरून तो भांडत असलेल्या दोन टोळक्यांच्या गर्दीत जात भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतोय. सोबतच तो एका गटाची बाजूही घेताना दिसतो. एका बाजूच्या लोकांना तिकडून जायला सांगितल्यावर तो दुसऱ्या गटाला मदतीसाठी ऑफरही करतो. हा व्हिडीओ खालच्या लिंकवर पाहता येईल.

यापूर्वीसुद्धा सिद्धार्थचा एक VIDEO VIRAL झाला होता. तो व्हीडिओ ज्या माणसाने शूट केला तो सिद्धार्थवरच आरोप करताना ऐकू येत होतं. एका गरीब माणसाला सिद्धार्थ कसा मारतोय आणि तो कसा दारू पिऊन गाडी चालवतोय असा गंभीर आरोप  त्या व्यक्तीने व्हिडीओत केला होता.

या वेळी मात्र  सिद्धार्थच्या रस्त्यावरच्या भांडणाचा व्हिडिओ पाहून चाहते त्याला दाद देत आहेत.

Published by: News18 Desk
First published: December 15, 2020, 6:31 PM IST

ताज्या बातम्या