Home /News /entertainment /

धावत येत चाहत्याने विचित्र पद्धतीने केला स्पर्श; गर्दीत घडलेल्या त्या प्रकारामुळे गोंधळली मौनी रॉय, VIDEO

धावत येत चाहत्याने विचित्र पद्धतीने केला स्पर्श; गर्दीत घडलेल्या त्या प्रकारामुळे गोंधळली मौनी रॉय, VIDEO

नुकताच मौनीला एक भीतीदायक अनुभव आला. एका चाहत्यानं सेल्फी काढण्यासाठी मौनीला स्पर्श करण्याचा (fan misbehaved) प्रयत्न केला.

मुंबई 09 डिसेंबर : आपल्याकडे बॉलिवूड इतकंच टीव्ही जगतही खूप लोकप्रिय आहे. मोठ्या पडद्यावरील कलाकारांना चाहते जितकं प्रेम देतात तितकंच प्रेम छोट्या पडद्यावरील कलाकारांनाही देतात. काही टीव्ही कलाकार तर बॉलिवूड सेलिब्रेटींपेक्षाही जास्त लोकप्रिय आहेत, विशेषत: टीव्ही अभिनेत्री. लोकप्रियतेच्या बळावर काही अभिनेत्रींनी टीव्हीपासून सुरू केलेली आपली कारकीर्द मोठ्या पडद्यापर्यंत नेली आहे. अशाच लोकप्रिय टेलीव्हिजन चेहऱ्यांमध्ये अभिनेत्री मौनी रॉयचा (Mouni Roy) समावेश होतो. 'नागिन' आणि 'देवों के देव महादेव' या दोन सिरियल्समुळं मौनी घराघरात जाऊन पोहचली आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. मौनी कायम आपल्या चाहत्यांसोबत चांगली वर्तणूक करत असते. मात्र, नुकताच मौनीला एक भीतीदायक अनुभव आला. एका चाहत्यानं सेल्फी काढण्यासाठी मौनीला स्पर्श करण्याचा (Fan Misbehaved With Mouni Roy) प्रयत्न केला. बॉलिवूड लाईफ डॉट.कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हेही वाचा - ‘खासदार असल्याचं भान ठेवा’, देश दु:खात असताना Bold Photo केला पोस्ट बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडिओ (Mouni Roy Video) इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चाहता तिच्यासोबत सेल्फी (Selfie) काढण्यासाठी तिला मागून स्पर्श करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मौनी रॉय जुहूतील रेकॉर्डिंग स्टुडियोतून बाहेर पडत असताना तिला चाहत्यांनी घेरलं होतं. तीदेखील तिच्या चाहत्यांना आनंदानं भेटत होती. त्यावेळी अचानक मागून एक व्यक्ती आला आणि त्यानं मौनीशी लगट करून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीचा असा पवित्रा पाहून मौनी काही काळासाठी गोंधळून गेली होती. तिनं त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्नही केला.
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

आपल्यासोबत अचानक असा प्रकार झाल्यानं मौनी घाबरली देखील होती. बॉलिवूड न्यूज देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वुमप्लानं (Voompla) याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. चाहत्यांनी कलाकारांना भेटताना काही मर्यादा पाळाव्यात असं कॅप्शनदेखील या व्हिडिओला देण्यात आलं आहे. हेही वाचा - अभिनेत्रीचे वय लपवण्यासाठी हिरोला.., रामायणच्या लक्ष्मणाने केली बॉलिवूडची पोलखोल 10 डिसेंबर 21 ला रिलीज होणाऱ्या 'वेले' (Velle) या चित्रपटामध्ये मौनी रॉय अभय देओलसोबत एका खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात करण देओल मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय मौनी अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर मौनी तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळेही चर्चेत आहे. ही नागिन फेम स्टार येत्या जानेवारीमध्ये (2022) लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
First published:

Tags: Tv actress, Tv celebrities

पुढील बातम्या