VIRAL VEDIO : गर्दीचा फायदा घेत त्यानं जबरदस्तीनं केलं निक जोनसच्या 'या' एक्स गर्लफ्रेंडला किस

VIRAL VEDIO : गर्दीचा फायदा घेत त्यानं जबरदस्तीनं केलं निक जोनसच्या 'या' एक्स गर्लफ्रेंडला किस

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे माइली सायरस चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 जून : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सिंगर माइली सायरस काही दिवसांपूर्वी तिचा एक्स बॉयफ्रेंड निक जोनससोबतच्या चॅटचा स्क्रिनशॉट शेअर केल्यानं चर्चेत आली होती. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माइली आपल्या पतिसोबत एका कार्यक्रमाला जात असताना एका चाहत्यानं तिला जबरदस्तीनं पकडून किस केलं आणि हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या माइलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

माइली सायरस तिचा पती लियाम हेम्सवर्थ सोबत स्पेनच्या बार्सिलोना येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. या कार्यक्रमासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये माइली या गर्दीतून वाट काढत पुढे जाताना दिसते. यावेळी एक व्यक्ती मागून येऊन तिला किस करताना दिसत आहेत. या ठिकाणी एवढी गर्दी होती की, कोणाला काय होतंय याचा अंदाजही आला नाही आणि या अनपेक्षित प्रकारानं माइली सुद्धा गोंधळून गेली मात्र काही स्वतःला सावरत ती तिथून निसटली.

सलमानचा ‘दबंग’ अवतार, भरगर्दीत स्वतःच्याच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली, Video Viral

या घटनेनंतर माइली आणि तिचा पती लियाम यांना त्यांचा गार्डनं त्या व्यक्तीपासून दूर केलं. पण हा व्हिडिओ काही वेळातच सगळीकडे व्हायरल झाला. त्यानंतर माइलीसोबत घडलेल्या या प्रकारावर अनेकाच्या तिखट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. तसेच या व्यक्तीवर कादेशीर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.

Bigg Boss Marathi 2 - अभिजीत बिचकुलेंचा उडालाय गोंधळ, तर किशोरी शहाणेंना कोसळलं रडू

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashley O (@mileycyrus) on

माइलीला तिचा शो 'हॅना मॉन्टेना'मुळे सगळीकडे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिचा हा कार्यक्रम लोकांमध्ये एवढा लोकप्रिय ठरला होता की, त्याचे 4 सीझन झाले. यानंतर माइलीची एक खास प्रतिमा लोकांच्या मनात तयार झाली होती. सिंगर निक जोनसशी ब्रेकअप झाल्यानंतर 2018मध्ये माइलीनं लियाम हेम्सवर्थशी लग्न केलं मात्र निक आणि माइली आजही चांगले मित्र आहेत. माइली लवकरच प्रसिद्ध टीव्ही शो ब्लॅक मिररमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

शाहिद आणि कियाराचा हा Kissing सीन होतोय Viral

First published: June 5, 2019, 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading