• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • सोनू सूदसाठी चाहत्याने धरला उपवास; अभिनेत्याने केलं कळकळीचं आवाहन

सोनू सूदसाठी चाहत्याने धरला उपवास; अभिनेत्याने केलं कळकळीचं आवाहन

अभिनेता सोनू सूदने (Sonu sood) चाहत्याला असा सल्ला दिला ज्यामुळे तुमच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढेल.

  • Share this:
मुंबई, 22 एप्रिल : लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात हजारो गरीब मजुरांच्या मदतीसाठी धावलेला बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood) सगळ्यांच्याच मनात आदराचं स्थान प्राप्त केलं आहे. त्याच्या या कामामुळे लोकांनी त्याला देवदूतचं म्हटलं आहे. अशा या देवदूताला कोरोनाची (Corona Virus Infection) लागण झाल्याचं कळताच त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं. त्याची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी असंख्य लोकांनी प्रार्थना केली आहे. तर पप्पू नावाच्या एका चाहत्यानं सोनूसाठी नवरात्रीचे उपवास (Navratri Fast) धरले. प्रवीणकुमार या ट्विटर युझरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ‘गरीबांना मदत करणारी व्यक्ती ही त्यांच्यासाठी देवाचंच रूप असते. सोनू सूदजी तुमची प्रकृती बरी नसल्याचं कळलं म्हणून तुमच्यासाठी नवरात्रीचे उपवास करत आहे’,असं त्यानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या चाहत्याच्या या पोस्टला सोनू सूदने उत्तर दिलं. त्यात त्यानं त्याला स्वतःला नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रार्थना करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. सोनू सूदने ट्वीट केलं, "पप्पू भाई व्रत माझ्यासाठी नाही तर देशातील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी करा. माझ्यापेक्षा देशातील अनेक लोकांना तुमच्या प्रार्थनेची अधिक गरज आहे", असं आवाहन सोनूनं आपल्या चाहत्याला सांगितलं आहे हे वाचा - ‘टिव्ही, रिमोट सोडा, देश जोडा.....’, सोनू सूदचं नवं आवाहन सोनू सूद स्वतःच सोशल मीडियावरून 17 एप्रिल रोजी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं होतं. आपण घरीच क्वारंटाईन असून काळजीचं कारण नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं होतं. आता या काळात लोकांची मदत करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असंही त्यानं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. कोरोना साथीच्या संकटाच्या पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिल्यांदा लॉकडाउन जाहीर झाला तेव्हा बेरोजगार झालेले मजूर आपल्या कामाच्या ठिकाणाहून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या आपल्या मूळ गावी निघाले. मिळेल त्या वाहनाने, सायकलवरून किंवा पायी निघालेल्या मजुरांचं दृश्य मन हेलावणारं होतं. अशा परिस्थितीत सोनू सूद या मजुरांच्या मदतीला धावून आला. त्याने मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था केली. अन्नधान्य, आर्थिक मदतही केली. नंतरच्या काळातही त्याचा हा वसा कायम असून बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यानं एक अॅप निर्माण केलं. त्याद्वारे हजारो लोकांना रोजगार मिळवून देण्याचा तो प्रयत्न करत आहे. हे वाचा - 'या' लोकांना मोफत कोरोना लस देणार; प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली लसीकरणाची जबाबदारी आताही तो बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषध गरजूंना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.  त्याच्या या परोपकारी वृत्तीमुळं त्यानं लाखो लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
First published: