मुंबई, 15 डिसेंबर : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दोघांच्या अफेअरचीही बरीच चर्चा आहे. मध्यंतरी आलियानं ट्विटरवर #askalia हे सेशन केलं. त्यावेळी तिनं अनेकांना सडेतोड उत्तरंही दिली.
यावेळी एका फॅननं आगाऊपणा केला. त्यानं आलियाला विचारलं, मी तुला आलिया कपूर म्हणू का? त्यावर हिमांशू नावाच्या त्या फॅनला आलिया ताबडतोब म्हणाली, तुम्हाला हिमांशू भट्ट म्हणू का?
Can I call you Himanshu Bhatt? https://t.co/3jRIcZLEzK
— Alia Bhatt (@aliaa08) 13 December 2018
सध्या आलिया भट्ट कपूर कुटुंबीयांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेता ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना पाहण्यासाठी आलियाने देखील न्यूयॉर्कला भेट दिली होती. रणबीर-आलियाचे न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरतानाचे फोटोससुद्धा त्यावेळी व्हायरल झाले होते.
लक्स गोल्डन रोस अॅवॉर्डच्या रेड कार्पेटवर आलियानं लग्नाबाबत खुलासा केला आहे की बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा काळ चालू आहे. यावेळी तिने दीपिका आणि रणवीरला लग्नासाठी शुभेच्छा देत प्रियांकाच्या लग्नाबाबत ती फार खूश आहे असं तिने म्हटलं आहे.
यानंतर 'तुमच्या लग्नासाठी आम्हाला किती वाट पाहावी लागेल? असा प्रश्न विचारताच 'थोडी अजून वाट पाहावी लागले' असं उत्तर आलियानं दिलं आहे. 'क्लायमॅक्स चांगला झाला पाहिजे आणि शेवटही आनंदी व्हावा असं आलियाला वाटतं आहे.
ब्रह्मास्त्र सिनेमा एक रोमँटिक कथा आहे आणि त्याला सुपरनॅचरल शक्तीची जोड आहे. रणबीर आणि आलिया यांचा रोमान्स सिनेमात पहायला मिळणार आहेच. पण त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची हटके भूमिका या सिनेमात असेल.
PHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी!