मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shocking! हनी सिंगच्या पत्नीची कोर्टात धाव; घरगुती हिंसाचाराचे केले आरोप

Shocking! हनी सिंगच्या पत्नीची कोर्टात धाव; घरगुती हिंसाचाराचे केले आरोप

घरगुती हिंसाचार (Domestic violence), मानसिक आणि लैंगिक हिंसाचार, आर्थिक हिंसाचार असे गुन्हे त्याच्यावर दाखल केले आहेत.

घरगुती हिंसाचार (Domestic violence), मानसिक आणि लैंगिक हिंसाचार, आर्थिक हिंसाचार असे गुन्हे त्याच्यावर दाखल केले आहेत.

घरगुती हिंसाचार (Domestic violence), मानसिक आणि लैंगिक हिंसाचार, आर्थिक हिंसाचार असे गुन्हे त्याच्यावर दाखल केले आहेत.

मुंबई 3 ऑगस्ट : प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हनी सिंग ची पत्नी शालिनी तलवारने (Shalini Talwar)  हनी विरोधात केस नोंदवली आहे. घरगुती हिंसाचार (Domestic violence), मानसिक आणि लैंगिक हिंसाचार, आर्थिक हिंसाचार असे गुन्हे त्याच्यावर दाखल केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बॉलिवूडमध्ये हनी सिंगच मोठं नाव आहे. अनेक सुपरहिट गाणी त्याने दिली आहेत. त्यामुळे त्याच्या विरुद्ध त्याच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात तिने हा गुन्हा नोंदवला आहे. घरगुती हिंसाचाराच्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे. 3 ऑगस्टला ही तक्रार नोंदवण्यात आली.

मिस्टर परफेक्शनिस्टचा 56व्या वर्षीही तरुणांना लाजवणारा फिटनेस; पाहून मुलगी आयरा म्हणाली..

वकील संदीप कपूर, अपूर्वा पांडे, जी जी कश्यप यांनी शालिनी तलवार (Honey singh’s wife filed case) यांच्या वतीने ही तक्रार सादर केली. तर कोर्टाने आता हनी सिंगला नोटीस बजावली आहे. 28 ऑगस्ट पर्यंत त्याला उत्तर देण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय कोर्टाने शालिनीच्या बाजूने काही बाबी लक्षात घेता एकत्रित प्रॉपर्टी वर हनी सिंगला कोणताही हक्क दाखवण्याची परवानगी दिलेली नाही.

पिंक पिंक! नोरा फेतेहीचा गुलाबी अवतार पाहून पडाल प्रेमात; फोटोंवर चाहते फिदा

2014 साली हनी सिंगने सर्वात आधी शालिनी ला प्रेक्षकांसमोर आणला होतं. ‘इंडियाज रॉस्टार’ (Indias Rawstar) या कार्यक्रमात त्याने ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याच्या चाहत्यांना त्याने धक्का दिला होता. मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये झळकण्याआधीच त्याने विवाह केला होता.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Singer