Home /News /entertainment /

भुवन बामवर कोसळला दुःखाचा डोंगर; कोरोनामुळं गमावले आई-वडील

भुवन बामवर कोसळला दुःखाचा डोंगर; कोरोनामुळं गमावले आई-वडील

प्रसिद्ध युट्युबर भुवन बामवर कोसळला दुःखाचा डोंगर; आई-बाबांच्या मृत्यने सोशल मीडियावर शोककळा

  मुंबई 13 जून: देशभरातील कोरोनाचं (Corona) संकट अजूनही संपण्याचं नाव घेत नाही. अनेकांनी आपल्या प्रियजनांना या महामारीत (Pandemic) गमावलं आहे. यातच आता सोशल मीडिया आणि युट्युबस्टार (Youtuber) भुवन बामला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आई आणि बाबा दोघांचही छत्र त्याने गमावलं आहे. दोघांनीही कोरोनाची लागण झाली होती. दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. उपचारही सुरू होेते मात्र उपचारादरम्यानचं त्यांचा मृत्यु झाला. (Bhuvan Bham parents death) भुवनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून याची माहिती दिली तसेच त्याने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. तो म्हणतो, “कोरोनामुळे मी माझ्या पालकांना गमावले आहे. आई आणि बाबांशिवाय काहीही पहिल्यासारखे राहणार नाही. एका महिन्यात सर्व उद्ध्वस्त झाले. घर, स्वप्ने, सर्व काही. माझी आई माझ्याजवळ नाही, माझे बाबा माझ्याजवळ नाहीत. आता मला सुरुवातीपासून पुन्हा जगायला शिकावं लागेल. पण मन नाही लागत.”
  View this post on Instagram

  A post shared by Bhuvan Bam (@bhuvan.bam22)

  पुढे त्याने म्हटलं आहे, “मी चांगला मुलगा होतो का? मी त्यांना वाचवण्याचे सगळे प्रयत्न केले का? मला आता या प्रश्नांसोबत आयुष्यभर जगावे लागेल. मी त्यांना पुन्हा भेटण्याची वाट पाहू शकत नाही. मी प्रार्थना करतो, की तो दिवस लवकरच येईन.”

  HBD : जाहिरातीतून मिळाली होती प्रसिद्धी; पाहा दिशा पाटनीचा अभिनय प्रवास

  यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर (Social Media) त्याला कमेंट करत आधार देण्याचाही प्रयत्न केला. अभिनेता वरुण धवन, राजकुमार राव, रिचा चड्डा, कार्तिक आर्यन, अरमान मलिक यासहा अनेकांनी शोक व्यक्त करत कमेंट्स केल्या होत्या. सोशल मीडियावर यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. भुवन बामची देशभरात तसेच देशाबाहेरही मोठी फॅनफॉलोइंग आहे. कॉमेडीयन आणि अभिनेता म्हणूनही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली होती. तो देशातील पहिला स्वतंत्र सर्वाधिक सबस्क्राइबर्स असणारा युट्युबरही ठरला होता.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Youtubers

  पुढील बातम्या