मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Namita Vankawala : 41 व्या वर्षी अभिनेत्री बनली जुळ्या मुलांची आई, जन्माष्टमीच्या मुहर्तावर दिली Good News

Namita Vankawala : 41 व्या वर्षी अभिनेत्री बनली जुळ्या मुलांची आई, जन्माष्टमीच्या मुहर्तावर दिली Good News

तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नमिता वांकावाला चौधरी (Namita Vankawala Chowdhary) आई बनली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी नमिता आई झालीये.

तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नमिता वांकावाला चौधरी (Namita Vankawala Chowdhary) आई बनली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी नमिता आई झालीये.

तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नमिता वांकावाला चौधरी (Namita Vankawala Chowdhary) आई बनली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी नमिता आई झालीये.

  मुंबई, 20 ऑगस्ट : यंदाच्या वर्षी अनेक कलाकार प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहेत. तर काही अभिनेत्री आई बनल्या आहेत. अशातच आणखी एक अभिनेत्री आई बनली आहे. तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नमिता वांकावाला चौधरी (Namita Vankawala Chowdhary) आई बनली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी नमिता आई झालीये. नमिता 2 मुलांची आई झाली असून नमिताने स्वतः श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये. या बातमीनं तीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. नमिता वांकावाला चौधरीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर 2 जुळ्या मुलांना जन्म दिला दिल्याचं सांगितलं. 'हरे कृष्णा! या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना आमची चांगली बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही जुळ्या मुलांचे पालक आहोत. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव त्याच्या पाठीशी राहील अशी आशा आहे', असं नमितानं शेअर केलेल्या व्हिडीओतील कॅप्शनमध्ये म्हटलंय.
  नमितानं पुढे लिहिलं की, आम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रोमपेट खूप आभार मानतो त्यांनी उत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्या. माझ्या गरोदरपणात माझ्या मुलांना या जगात आणण्यासाठी मला मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. भुवनेश्वरी आणि त्यांच्या टीमची मी ऋणी आहे. डॉ. ईश्वर आणि डॉ. वेल्लू मुर्गन यांचेसुद्धा खूप खूप आभार. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा!' हेही वाचा -  Katrina Kaif Pregnancy: विकीसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली कतरिना कैफ; प्रेग्नेंसीच्या चर्चांनी धरला जोर दरम्यान, नमिताने 2017 मध्ये वीरेंद्र चौधरीसोबत लग्न केले आणि पहिल्यांदा तिने 10 मे 2022 रोजी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सगळ्यांना सांगितले. आई बनायच्या पहिले नमितानं बेबी बंप फोटोशूट केलं होतं. यामध्ये नमितानं हटके पोझ देत बेबी बंप फ्लाॅन्ट केलं होतं. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. नमिता राजकारणाच्या क्षेत्रातही योगदान करताना  दिसते. ती तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करते.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: BJP, Instagram post, Pregnancy, Social media, South actress

  पुढील बातम्या