• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शोलेच्या ठाकूरची मिमीक्री करणारे अभिनेते माधव मोघे यांचं निधन

शोलेच्या ठाकूरची मिमीक्री करणारे अभिनेते माधव मोघे यांचं निधन

प्रसिद्ध मिमीक्री आर्टीस्ट माधव मोघे यांचं निधन झालं आहे.

 • Share this:
  मुंबई 11 जुलै : प्रसिद्ध मिमीक्री (Mimicry artist) आर्टिस्ट माधव मोघे (Madhav Moghe) यांचं 11 जुलैला निधन झालं होतं. ते कर्करोगाने (Cancer) ग्रस्त होते. प्रसिद्ध चित्रपट शोलेच्या ठाकूरची मिमीक्री करून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. अनेक टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केलं होतं. ते 68 वर्षांचे होते. 1993 साली त्यांनी ‘दामिनी’ (Damini) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं होतं. सनी देओल, ऋषि कपूर, अमरीश पुरी आणि मीनाक्षी शेषाद्री या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. याशिवाय काही मराठी चित्रपटांतही (Marathi Films) ते झळकले होते.

  52 व्या वर्षीही जेनिफरच्या हॉट अदा; अभिनेत्री ठरतेय Sexiest Woman Alive

  'एमटीवी फुल्ली फालतू' या शोमध्ये ही ते दिसले होते. याशिवाय 'दामिनी', 'घातक', 'विनाशक', और 'पार्टनर' अशा सुपरहिट बॉलिवूड (Bollywood films) चित्रपटांत त्यांनी काम केलं होतं. अनेक मराठी चित्रपटांतही ते दिसले होते.   उत्पल दत्त और राजकुमार यांचीही मिमीक्री ते करायचे. त्यांना संजीव कपूर यांची कॉपी असं म्हटलं जायचं.

  कमालच! ऋतुजाने नेसला साडीचा Fancy Gown; लुकवर चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

  2011 साली 'जाना पहचान' या चित्रपटात त्यांना शेवटचं चित्रपटात पाहिलं गेलं होतं. त्यानंतर ते चित्रपटांत जास्त दिसले नाहीत. गेले काही वर्षे ते कर्करोगाने ग्रस्त होते. माधव यांच्या पत्नीचंही काहीच दिवसांपूर्वी म्हणजे 21 जून ला निधन झालं होतं. त्या किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. माधव यांनी बॉलिवूडसह मराठी चित्रपटांतही काम केलं होतं. अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्यासह जान पहचान या चित्रपटात ते दिसले होते. देश, विदेशात अनेक स्टेज शो (Stage show) त्यांनी केले होते.
  Published by:News Digital
  First published: