Home /News /entertainment /

'बुलाती है मगर...'फेम शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण, चाहत्यांना केली खास विनंती

'बुलाती है मगर...'फेम शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण, चाहत्यांना केली खास विनंती

राहत इंदौरी यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

    इंदुर, 11 ऑगस्ट : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिलेब्रिटींपासून ते राजकीय  नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राहत इंदौरी यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'अचानक लक्षण जाणवू लागल्यामुळे सोमवारी रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. आता त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे' अशी माहिती इंदौरी यांनी दिली. तसंच,'मी आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, माझ्यासाठी नक्की प्रार्थना करा. पण एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका, माझ्या तब्येतीबद्दल मी ट्वीटर आणि फेसबुकवर याची माहिती देत राहिल' अशी विनंतीही इंदौरी यांनी केली. 24 तासांत 53 हजार 601 नवीन कोरोनाबाधित! दरम्यान, देशात 9 दिवसांनंतर आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे.  गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये 60 हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण प्रत्येक दिवसाला सापडत होते. तर 24 तासात साधारण 1000 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हे प्रमाण आज कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, 6 दिवसांपासून सुरू आहे कोरोनावर उपचार केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत 53 हजार 601 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 लाख 68 हजार 675 वर पोहोचला आहे. याशिवाय कोरोनामुळे 871 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत हा आकडा 45 हजार 257 वर पोहोचला आहे. देशात सध्या 6 लाख 39 हजार 929 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या