• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • लैंगिक छळाचा आरोप असलेल्या अनुराग कश्यपबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

लैंगिक छळाचा आरोप असलेल्या अनुराग कश्यपबाबत प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर : अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. 2014 साली अनुराग कश्यपने आपल्यावर जबरदस्ती केली होती, असं पायलने सांगितलं आहे. इतक्या वर्षांनंतर पायल घोष व्यक्त झाली आहे. नेमकं तिच्यासह अनुरागने काय केलं होतं. ते तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. यानंतर कंगना रणौत हिनेदेखील आपल्यासोबत बड्या अभिनेत्यांनी केलेल्या वागणुकीबद्दलचा अनुभव व्यक्त केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मदतीला मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आली आहे. तिने यासंदर्भात ट्विट केलं आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तू अत्यंत प्रामाणिक व्यक्त आहेत. तू नेहमीच मला आदरानं वागवलं आहेस. मी कधीच शब्दात तुला हे सांगितलं नाही..कारण मला कधीच त्याची गरज वाटली नाही. मात्र आज मला तुझे आभार मानायचे आहे. तू मला दिलेल्या आदरासाठी खूप धन्यवाद दुसरीकडे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "अभिनेत्री पायल घोषने जे काही सांगितलं आहे, तसं माझ्यासह अनेक अभिनेत्यांनीही केलं आहे. . बंद व्हॅन किंवा बंद खोलीत ते असं करायचे. पार्टीमध्ये फ्रेंडली डान्स करता करतात अचानक त्यांची जीभ तुमच्या तोंडाजवळ लावायचे. कामासाठी घरी बोलवायचे आणि मग तुमच्यासह जबरदस्ती करायचे" "अनुराग कश्यपबाबत बोलताना कंगनाने ट्वीट केलं आहे, पायल घोषने जे काही सांगितलं, तसं अनुराग करू शकतो. त्याने आपल्या सर्वच जोडीदारांना फसवलं आहे. तो मोनोगॅमस नाही हे त्याने स्वत:च स्वीकार केलं आहे. अनुरागने पायलसह जे काही केलं, ते बुलिवूडमध्ये सर्रासपणे होतं. स्ट्रगल करणाऱ्या आऊटसायडर मुलींना ते एखाद्या सेक्स वर्करसारखी वागणूक देतात", असं कंगनानं सांगितलं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: