मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संगीत विश्वाला आणखी एक धक्का, प्रसिद्ध गीतकार अभिलाष यांचे निधन

संगीत विश्वाला आणखी एक धक्का, प्रसिद्ध गीतकार अभिलाष यांचे निधन

अभिलाष (Lyricist Abhilash Passes Away) यांनी 'इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना' (Itni Shakti Hamein Dena Data) यासारखी लोकप्रिय गाणी लिहिली.

    मुंबई, 28 सप्टेंबर : एकीकडे ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनांचे दु:ख संगीत विश्व पचवत असतानाच प्रसिद्ध गीतकार अभिलाष यांनी आज जगाचा निरोप घेतला. अभिलाष (Lyricist Abhilash Passes Away) यांनी 'इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना' (Itni Shakti Hamein Dena Data) यासारखी लोकप्रिय गाणी लिहिली. यकृताच्या कर्करोगानं ग्रस्त असलेल्या अभिलाष यांनी आज पहाटे 4 च्या सुमारास जगाचा निरोप घेतला. अभिलाषने 'लाल चूडा' (1974), 'सावन को आने दो' (1979), 'अंकुश' (1986) सारख्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. दोन दिवसांपूर्वीच अभिलाष यांना यकृताचा कर्करोग असल्याची बातमी समोर आली होती. याआधी यावर्षी मार्चमध्ये अभिलाष यांच्या पोटाच्या आतड्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर, त्यांना चालण्यास त्रास होत होता. अभिलाषने मुंबईतील गोरेगाव येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माजी राष्ट्रपती झैल सिंग यांनी अभिलाष यांना कलश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. आजही त्यांनी लिहिलेल 'इतनी शक्ति हमें देना दाता' गाणं प्रसिद्ध आहे. आजही हे गाणं देशातील कित्येक शांळांमध्ये प्रार्थनेचा एक भाग आहे. हे गाणं जगभरात तब्बल 8 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. 'इतनी शक्ति हमें देना दाता' या गाण्याशिवाय अभिलाष यांची 'तुम्हारी याद के सागर में', 'संसाह रै इक नदिया' आणि आणि और 'सांझ भई घर आ जा' ही गाणीही खूप गाजली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या