Home /News /entertainment /

Pandit Birju Maharaj: प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pandit Birju Maharaj: प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pandit Birju Maharaj Passes Away:देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक (Kathak Maestro) आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

    नवी दिल्ली, 17 जानेवारी: देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक (Kathak Maestro) आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. रविवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (Pandit Birju Maharaj Passes Away) लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनऊ येथे झाला होता. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गायक अदनान सामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदनान सामीने सोशल मीडियावर लिहिलं - महान कथ्थक नृत्यांगना पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमीने मला खूप दु:ख झाले आहे. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. बिरजू महाराज यांची थोडक्यात ओळख लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनऊ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित ब्रिजमोहन मिश्रा होते. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केले. याशिवाय सत्यजित राय यांच्या 'शतरंज के खिलाडी' या सिनेमातही त्यांनी संगीत दिलं होतं. पुणेकरांनो काळजी घ्या..!  सलग तिसऱ्या दिवशी Corona चा विस्फोट बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली. 2012 मध्ये त्यांना विश्वरूपम सिनेमातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. 2016 मध्ये बाजीराव मस्तानीच्या 'मोहे रंग दो लाल' या गाण्याला नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या