मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पडद्यामागील किमयागार; अभिनेत्रींना सुपरस्टार बनवणाऱ्या महिला कलाकार

पडद्यामागील किमयागार; अभिनेत्रींना सुपरस्टार बनवणाऱ्या महिला कलाकार

अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध करण्यासाठी काही महिला कलाकार पडद्यामागे दिवसरात्र मेहनत करत असतात. सिनेसृष्टीतील अशाच कर्तृत्ववान महिलांबद्दल जाणून घेऊया...

अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध करण्यासाठी काही महिला कलाकार पडद्यामागे दिवसरात्र मेहनत करत असतात. सिनेसृष्टीतील अशाच कर्तृत्ववान महिलांबद्दल जाणून घेऊया...

अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध करण्यासाठी काही महिला कलाकार पडद्यामागे दिवसरात्र मेहनत करत असतात. सिनेसृष्टीतील अशाच कर्तृत्ववान महिलांबद्दल जाणून घेऊया...

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 8 मार्च: रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींचा खूप मोठा प्रेक्षकवर्ग असतो. सर्वत्र त्यांची स्तुती केली जाते. चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. परंतु त्या अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध करण्यासाठी काही महिला कलाकार पडद्यामागे दिवसरात्र मेहनत करत असतात. सिनेसृष्टीतील अशाच कर्तृत्ववान महिलांबद्दल जाणून घेऊया...

गौरी शिंदे – हे जाहिरात क्षेत्रातील एक नामांकित नाव आहे. (Gauri Shinde) तिनं आजवर 100 पेक्षा अधिक जाहिरातींचं दिग्दर्शन केलं आहे. जाहिरातीत यश मिळाल्यानंतर तिनं सिनेसृष्टीतही आपले हात आजमावून पाहिले. तिनं दिग्दर्शित केलेली ‘ओह मॅन’ ही शॉर्ट फिल्म प्रचंड गाजली होती. यानंतर तिनं ‘डियर जिंदगी’ आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटांचं देखील दिग्दर्शन केलं होतं.

फराह खान – बॉलिवूडमधील बॉस लेडी म्हणून फराह प्रसिद्ध आहे. (Farah Khan) डान्स कोरिओग्राफर म्हणून तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. शिवाय मै हू ना, ओम शांती ओम, तीस मार खान, हॅप्पी न्यू ईयर या चित्रपटांची देखील तिनं निर्मिती केली आहे.

अवश्य पाहा - International Women's Day: प्रेरणादायी! भारताचं नाव जगभरात

मेघना गुलजार – मेघना गुलजार ही एक प्रसिद्ध दिग्दर्शिका आहे. (Meghna Gulzar) ती प्रसिद्ध गीतकार गुलजार यांची मुलगी आहे. वडिलांप्रमाणेच ती देखील एक अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखली जाते. तिनं फिलाल, जस्ट मॅरेड, दस कहानिया, तलवार, राझी, छपाक यांसारख्या स्त्री प्रधान चित्रपटांची निर्मिती केली आहे.

रीमा कागती – ही दिग्दर्शिका आपल्या हटके पटकथांसाठी प्रसिद्ध आहे. (Reema Kagti) अक्षरश: प्रेक्षकांना अवाक् करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती ती करते. लगान. दिल चाहता है, गली बॉय, लक्ष्य, जिंदगी मिलेगी ना दोबारा, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिनं सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे.

अपर्णा सेन – हिंदी आणि बंगाली या दोन्ही सिनेसृष्टीत अपर्णा सक्रिय आहेत. (Aparna Sen) त्यांनी आजवर मिस्टर अँड मिसेस, द जॅपनिस वाईफ, गोईनार बक्षो, बसंता बिलाप, साथी, सोनाटा यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार यानं त्यांना गौरवण्यात आलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Womens day