जुन्या मालिका प्रसारित करण्याचा फॉर्म्युला हिट! 18 वर्षांनी पुन्हा होणार 'साराभाई' आणि 'पारेख' कुटुंबाची भेट

जुन्या मालिका प्रसारित करण्याचा फॉर्म्युला हिट! 18 वर्षांनी पुन्हा होणार 'साराभाई' आणि 'पारेख' कुटुंबाची भेट

एकेकाळी भारतीय टेलिव्हिजनवर राज्य करणाऱ्या काही जुन्या मालिका पुन्हा सुरू झाल्यामुळे अनेकांना आनंद झाला आहे. खिचडी', 'साराभाई vs साराभाई' पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल :  संपूर्ण देशभरात कोरोनामुळे (Coronavirus) गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमुळे घरातच राहावं लागत असल्याने मानसिक ताण देखील वाढतो आहे. अशा परिस्थितीत एकेकाळी भारतीय टेलिव्हिजनवर राज्य करणाऱ्या काही जुन्या मालिका पुन्हा  सुरू झाल्यामुळे अनेकांना आनंद झाला आहे. दूरदर्शनने 'रामायण', 'महाभारत' पुन्हा सुरू केलं. बच्चेकंपनीची आवडती मालिका शक्तिमानही आता पुन्हा पाहायला मिळते आहे. शेवटी 'जुनं ते सोनं' असं म्हणत अनेकांनी या मालिका पुन्हा एकदा आवडीने पाहायला सुरूवात केली आहे.

(हे वाचा-Lockdown चा कंटाळा आलाय? या 8 शॉर्ट फिल्म ठरतील मनोरंजनाचा चांगला पर्याय)

जुन्या मालिका पुन्हा सुरू होणाऱ्या यादीमध्ये आता आणखी दोन नाव जोडली जाणार आहात. या कॉमेडी मालिकांनी 90 चं दशक खूप गाजवलं होते. त्यांचे अनेक एपिसोड पायरेटेड वेबसाइट्सवर सुद्धा लीक झाले होते, इतकी प्रसिद्धी या मालिकांना मिळाली होती. तर या प्रसिद्ध कॉमेडी सिरियल्स म्हणजे, 'खिचडी' आणि 'साराभाई vs साराभाई'! या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणं म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा सुरू करावेत अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर समोर आलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही शो टीव्हीवर जोरदार कमबॅक करणार आहेत. 'खिचडी' आणि 'साराभाई vs साराभाई' पुन्हा सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा देखील सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

(हे वाचा-रि-टेलिकास्टच्या पहिल्याच आठवड्यात TRP रेटिंगमध्ये 'रामायण'चा इतिहास!)

'साराभाई vs साराभाई' 6 एप्रिलपासून सुरू होणार असून रोज सकाळी 10 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे. साराभाई कुटुंबीयांची भेट होणं अनेकांना आनंद देणारी बाब आहे. सतीश शाह, रतना पाठक, राजेश कुमार, सुमीत राघवान आणि रूपाली गांगुली यांची मुख्य भूमिका असणारी ही सिरियल 2004 मध्ये स्टार वन या चॅनेलवर सुरू झाली होती.

तर 'खिचडी' सुद्धा 6 एप्रिलपासूनच सुरू होणार आहे. या मालिकेची वेळ दररोज सकाळी 11 वाजता असणार आहे. प्रिया पाठक, वंदना पाठक, राजीव मेहता, जमनादास मजेठिया यांची प्रमुख भूमिका असणारी ही मालिका 2002 मध्ये सुरू झाली होती.

प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या या मालिका होत्या. त्यांनंतर या मालिकांचे आलेले सिक्वेल किंवा त्यांच्यावर बनलेले चित्रपट सुद्धा इतके लोकप्रिय झाले नाहीत. प्रेक्षकांनी यामधील कलाकारांना आणि जुन्याच कथानकाना जास्त प्रेम दिलं आहे. आता पुन्हा या मालिका सुरू होत असल्याने अनेकांनी सोशल मीडियावर त्यांता आनंद व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2020 03:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading