Home /News /entertainment /

VIDEO: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केला मुंबई लोकलचा प्रवास, तुमच्याशेजारी तर बसला नव्हता ना?

VIDEO: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केला मुंबई लोकलचा प्रवास, तुमच्याशेजारी तर बसला नव्हता ना?

बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक कलाकार आहेत, जे आजही अत्यंत साधं राहणीमान पसंत करतात. कारण त्यांनी अगदी शून्यातून आपलं जग उभं केलं आहे. त्यांना नेहमीच आपल्या गावाची किंवा छोट्या-छोट्या गोष्टींची ओढ असते.

  मुंबई, 30 मार्च-   बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  असे अनेक कलाकार आहेत, जे आजही अत्यंत साधं राहणीमान पसंत करतात. कारण त्यांनी अगदी शून्यातून आपलं जग उभं केलं आहे. त्यांना नेहमीच आपल्या गावाची किंवा छोट्या-छोट्या गोष्टींची ओढ असते. बॉलिवूडमध्ये असाच एक कलाकार आहे, ज्याने नुकतंच लोकलमधून प्रवास करत सर्वांनाच चकित केलं आहे. या अभिनेत्याने आपला चेहरा मास्कने झाकलेला होता. तुम्हाला हा अभिनेता ओळखता आला नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की हा अभिनेता इतर कुणी नसून नवाजुद्दीन सिद्दीकी   (Nawazuddin Siddiqui)  आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीन गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नव्या आलिशान घरामुळे प्रचंड चर्चेत आहे. या अभिनेत्याने अत्यंत हलाखीतून हे वाखाण्याजोगं साम्राज्य उभं केलं आहे. दरम्यान अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास   (Nawazuddin Siddiqui travel in Mumbai Local train)  करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. व्हायरल होत असलेल्या ट्रेन आणि रेल्वे स्टेशनच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवाजुद्दीन सिद्दीकी टी-शर्ट आणि ट्राउजर घालून रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालताना दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा मास्क घातला असून डोळ्यांवर गॉगलसुद्धा आहे.
  View this post on Instagram

  A post shared by V D O GLOBE (@vdo_box)

  वास्तविक, नवाजुद्दीन सिद्दीकी मीरा रोडमध्ये त्याच्या आगामी एका चित्रपटाचं शूटिंग करत होता. काही वेळातच त्याला एका कार्यक्रमासाठी शहराच्या पलीकडे जायचं होतं. त्यामुळे वाहतूक कोंडीतून बचाव करण्यासाठी आणि वेळ वाचविण्यासाठी अभिनेत्याने आपल्या आलिशान कारने जाण्याऐवजी मुंबई लोकलने जाण्याचा निर्णय घेतला. नवाजुद्दीन सिद्दीकी लोकल ट्रेनमधून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, मास्क आणि काळा चष्मा घातलेल्या नवाजला सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ओळखता आलं नाही.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Mumbai local, Viral video.

  पुढील बातम्या