लखनऊ, 17 जून : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधून दु:खद बातम्या येत आहेत. सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता अली फजल याच्या आईचं बुधवारी लखनऊ येथे निधन झाल्याचे वृत्त आहे. अभिनेत्याच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली.
17 जून रोजी सकाळी लखनऊ येथे अली फजल याच्या आईचं दीर्घ आजारापणातून निधन झालं. अलीकडे अली फजल याने पंतप्रधान मोदींकडे एक आवाहन केलं आहे. अलीकडेच अली फजल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सफुरा जरगर या महिलेला चांगल्या स्थितीत ठेवावे अशी मागणी केली होती. सफुरा जर्गर हिच्यावर नागरिकत्व सुधार अधिनियम (सीएए) विरोधात जमाव आणि हिंसाचाराचा आरोप आहे. जामिया मिलिया इस्लामियामधील एम फिलची विद्यार्थिनी सफुरा ही चार महिन्यांची गर्भवती आहे.
अली फजल यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, 'सर नरेंद्र मोदीजी तुरुंगात सफूरा जरगर नावाची गर्भवती महिला आहे. तिच्या आत एक जीव आहे. तिला अधिक चांगल्या स्थितीत ठेवण्याबाबत विचार करावा. शक्यतो आयसोलेशनमध्ये ठेवावे. या निर्णयामुळे देशातील मातांना सुरक्षित वाटेल.
हे वाचा-सुशांत सिंहचं अर्धवट राहिलेलं स्वप्न होणार पूर्ण; टीमने घेतली जबाबदारी
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, दिग्दर्शक मुकेश छाबडांची 7 तास चौकशी