मुंबई,21 डिसेंबर- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील (south Industry) प्रसिद्ध अभिनेत्री हमसा नंदिनी (Hamsa Nandini) हिला ग्रेड 3 चा ब्रेस्ट कॅन्सर ( breast cancer ) झाला आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर ( social media ) याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टसोबत एक ब्लॅक अँड व्हाईट ( black and white ) फोटो शेअर केला असून यामध्ये तिच्या डोक्यावर केस नसल्याचं दिसत आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
अभिनेत्री नंदिनी हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्याने तिच्या चाहत्यांचं मन हेलावलं आहे. नंदिनीला थर्ड लेव्हल ब्रेस्ट कॅन्सर आहे.आणि तिने याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हमसाने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला, पण तेव्हा चाहत्यांना हे माहीत नव्हतं की ती कॅन्सरशी झुंज देत आहे. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर ( Instagram ) ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करतानाच तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 18 वर्षांपूर्वी नंदिनीच्या आईचेही ब्रेस्ट कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यानंतर आता नंदिनीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या पोस्टमध्ये ती लवकरच जोरदार पुनरागमन करेल, असेही वचन तिने चाहत्यांना दिले आहे.
View this post on Instagram
'आयुष्यात कोणतेही वळण आले किंवा कधी, कितीही अन्यायकारक वाटले तरी मी पीडित होण्यास नकार देते. मी भीती, निराशावाद आणि नकारात्मकतेने जगण्यास नकार देते. मी काहीही सोडणार (Quit) नाही. प्रेम आणि धैर्याच्या जोरावर मी पुढे चालत राहीन आणि लढा देईन,' असं नंदिनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ती पुढे म्हणते, 'जवळपास 4 महिन्यांपूर्वी मला माझ्या स्तनात गाठ जाणवली. त्याचक्षणी मला माहीत होतं की आता माझं आयुष्य जसं सुरु आहे, तसं ते चालणार नाही. या आजारामुळे 18 वर्षांपूर्वी मी माझी आई गमावली. तेव्हापासून मी या आजाराच्या छायेत आहे. मी प्रचंड घाबरले होते. त्यानंतर काही तासाने मी क्लिनिकमध्ये आले आणि गाठ तपासली. तेव्हा मला सर्जिकल ऑन्कोलॉजिस्टला भेटायला सांगितले. त्यावेळी त्यांनी मला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. बायोप्सी करण्याच्या सल्ल्यानंतर माझी सर्व भीती खरी असल्याचे सिद्ध केले. मला ग्रेड 3 इनवेसिव्ह कार्सिनोमा असल्याचे निदान झाले.'
(हे वाचा:ED कार्यालतून बाहेर पडताना ऐश्वर्या राय कॅमेरात कैद, VIDEO आला समोर)
आणखी 7 वेळा करावी लागणार केमोथेरपी-
'ऑपरेशन करून माझी ती गाठी काढण्यात आली आहे. पण मला अनुवंशिक स्तनाचा कॅन्सर असल्याचं विविध वैद्यकीय चाचण्यांतून पुढे आले आहे,' असेही नंदिनीने पोस्टमध्ये स्पष्ट केलंय. 'माझ्या शरीरात अनुवंशिक म्युटेशन आहेत. ज्यामुळे मला आयुष्यात पुन्हा ब्रेस्ट कॅन्सर होण्याची 70 टक्के शक्यता आहे. आतापर्यंत मी 9 वेळा केमोथेरपी केली असून अजून 7 वेळा केमोथेरपी करावी लागणार आहे,” असेही ती म्हणते.
नंदिनीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. मात्र, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तिने या आजारावर लवकरात लवकर मात करावी, अशी प्रार्थना देखील चाहत्यांकडून करण्यात येऊ लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breast cancer, South actress