मुंबई, 24 जून- ‘पवित्रा रिश्ता’(Pavitra Rishta) फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नेहमीच चर्चेत असते. अंकिता सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्रीने नुकताच आपला एक व्हिडीओ शेयर (Viral Video) केला आहे. यामध्ये ती पूजा करताना दिसून येत आहे. ते पाहून चाहत्यांना खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. अंकिता नेमकी कोणती पूजा करत आहे? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोंघावत आहे. चला तर मग जाणून घेऊया...
View this post on Instagram
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेला ओळखलं जातं. अंकिताने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं आहे. तसेच अंकिता सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही तिला भरभरून दाद देत असतात. अंकिताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये अंकिता लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून येत आहे. तसेच तिच्या बाजूला पंडितही बसलेले दिसत आहेत. आणि ते काहीतरी मंत्र उच्चारत आहेत. एकंदरीतचं अंकिता कोणती तरी पूजा करत असल्याचं दिसत आहे.
(हे वाचा:आफ्रिकेत साजरी होणार सोनालीची पहिली वटपौर्णिमा; अभिनेत्रीने शेयर केले खास PHOTO )
आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होतं आहे. आणि याचचं निमित्त साधून अर्चनाने घरी पूजापाठचं आयोजन केल आहे. अंकिता जरी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये कार्यरत असली. तरी ती मूळची महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे ती प्रत्येक मराठमोळा सन तितक्याच उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करते.
(हे वाचा: रश्मिकाला भेटण्यासाठी चाहत्याने पार केलं 900 किमी अंतर पण..,वाचा काय घडलं )
अंकिताला झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तिची अर्चनाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खुपचं भावली होती. आजही लोक तिला अर्चना या नावानेचं ओळखतात. या मालिकेतील अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेची जोडी आजही चाहत्यांच्या मनात तशीच आहे. आजही लोक मानव अर्चनाला मिस करतात. लवकरच ‘पवित्र रिश्ता 2’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ankita lokhande, Tv actress