Home /News /entertainment /

बॉलीवूडवर पुन्हा एकदा शोककळा, शोले सिनेमातील सुरमा भोपालींचं निधन

बॉलीवूडवर पुन्हा एकदा शोककळा, शोले सिनेमातील सुरमा भोपालींचं निधन

वयाच्या 81 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

    नवी दिल्ली, 08 जुलै : बॉलावूड क्षेत्रामध्ये आणखी एका अभिनेत्याचं निधन झालं आहे. शोले या सगळ्यात गाजलेल्या सिनेमातील सुरमा भोपाली म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता जगदीप यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. जगदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. ‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचं खरं नाव सय्यद इश्तियाक जाफरी आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीपचा यांचा मुलगा आहे. जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी ब्रिटिश इंडिया इथे दतिया सेंट्रल प्रोव्हिंगमध्ये झाला. त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. पण 1994 च्या 'अंदाज अपना अपना', 1975 मधील 'शोले' आणि 1972 मधील 'अपना देश' मधील त्यांच्या अभिनयाने चाहत्यांमध्ये त्यांची एक वेगळीच छाप होती. 1951मध्ये बालकलाकार म्हणून जगदीप यांनी 'अफसाना' चित्रपटाद्वारे सिने जगतात प्रवेश केला आणि कॉमेडियन म्हणून त्यांनी 'दो बिघा ज़मीन' या सिनेमातून पदार्पण केले. आज त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या