Home /News /entertainment /

अनुराधा पौडवाल यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शुक्राचार्यांच्या मंदिराला दिली भेट, तब्बल 3 तास कोणती केली पूजा ?

अनुराधा पौडवाल यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शुक्राचार्यांच्या मंदिराला दिली भेट, तब्बल 3 तास कोणती केली पूजा ?

गायिका अनुराधा पौडवाल यांनी ( anuradha poudwal visited the temple of shukracharya ) अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बेटावरील गुरु शुक्राचार्यांच्या मंदिराला भेट दिली.

    अहमदनगर, 30 मे- प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी (  anuradha poudwal visited the temple of shukracharya  ) अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बेटावरील गुरु शुक्राचार्यांच्या मंदिराला भेट दिली. या मंदिरात त्यांनी शांतपणे देवाची पूजा केली. याचे काही फोटो देखील समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर सायंकाळी 5 वाजता शुक्राचार्यांच्या मंदिराता पोहोचल्या होत्या. त्यांनी तीन ास मंदिरात पूजा केली. त्यांच्या या ही दर्शन यात्रेबद्दल पूर्णपणे गोपिनीयता बाळगण्यात आली होती. माध्यमांना याची माहिती मिळाली तेव्हा त्या पूजा करताना दिसल्या. अनुराधा यांनी या मंदिरात कोणती पूजा केली याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण जास्तवेळ त्या पूजा करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. पूजा झाल्यानंतर त्या मुंबईसाठी रवाना झाल्या. वाचा-वैदेहीपेक्षा सुंदर दिसते मल्हारची खऱ्या आयुष्यातील बायको;पाहा सुखदाचे सुंदर फोटो मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब अव्हाड यांनी याबद्दल सांगितलं की, अनुराधा यांची ही वैयक्तिक पूजा होती. याबाबत त्यांनी पूर्णपणे गोपिनीयता बाळगण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी याठिकाणी केलेली पूजा ही शांती पूजा असल्याचे देखील मंदिराच्या अध्यक्षांनी सांगितले. मंदि‍रात शुभकार्य, वि‍वाह करण्‍यास कोणताही मुहूर्त लागत नाही कोपरगाव येथे गुरु शुक्राचार्य यांचे मंदि‍र आहे. या मंदि‍रात शुभकार्य, वि‍वाह करण्‍यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदि‍र असल्‍याची भक्‍तांची धारणा आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या