मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Falguni Pathak VS Neha Kakkar: नेहा कक्करवर केस करणार फाल्गुनी पाठक? काय आहे नेमकं प्रकरण?

Falguni Pathak VS Neha Kakkar: नेहा कक्करवर केस करणार फाल्गुनी पाठक? काय आहे नेमकं प्रकरण?

फाल्गुनी पाठक नेहा कक्कर

फाल्गुनी पाठक नेहा कक्कर

दोन प्रसिद्ध गायिका ऐन नवरात्रीत आमने-सामने का आल्यात? फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यातील नेमका वाद काय आहे जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 24 सप्टेंबर : सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह सुरू आहे. सर्वत्र नवरात्रीची गाणी वाजण्यास सुरूवात झाली आहे. गरब्याची गाणी म्हटली की 90 च्या दशकातील गाण्यांची क्विन फाल्गुनी पाठकची आठवण हमखास येते. सध्या फाल्गुनी पाठक नवरात्रीमुळे चर्चात आहेच मात्र आणखी एका कारणासाठी ती चर्चेत आली. बॉलिवूडची नवोदित प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचं नाव देखील या चर्चेत आहे. फाल्गुनी पाठक नेहा कक्करवर पोलीस केस करणार आहे असंही म्हटलं जात आहे. काय आहे नेमकं प्रकरण? दोन प्रसिद्ध गायिका ऐन नवरात्रीत आमने-सामने का आल्यात? जाणून घ्या.

गायिका नेहा कक्कर हिनं फाल्गुनी पाठक हिचं 'मैंने पायल है छनकाई' या गाण्याचा रिकेम व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. 90च्या दशकात आलेलं फाल्गुनीच्या या गाण्याच्या सुपरहिट ट्रॅक नेहानं तिच्या गाण्यात अ‍ॅड केला आहे. या गाण्यानं सध्या सर्वत्र चर्चा रंगल्या असून गायिका नेहा कक्करला या वरून प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.

हेही वाचा - 'अनुपमा' फेम रुपालीने अभिनेता सोडून 'या' क्षेत्रातील व्यक्तीशी का केलं लग्न? आता केला खुलासा

गायिका फाल्गुनी पाठक हिनं याविषयी म्हटलं आहे की, 'नेहानं किंवा नेहाच्या टीमनं हे गाणं करताना किंवा गाणं केल्यानंतरही माझ्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. मी नेहा विरोधात कायदेशीर कारवाई करणार होते पण मी तसं केलं नाही कारण माझ्याकडे या गाण्याचे राईट्स नाहीत'.  एकंदरीतच मैंने पायल है छनकायी या गाण्याचा नेहा कक्करनं केलेला रिमेक पाहून फाल्गुनी पाठक खुश नाही.

फाल्गुनीचं ओरिजिनल गाणं

" isDesktop="true" id="765171" >

सोशल मीडियावरही नव्या गाण्याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.  ओरिजिनल गाण्याच्या तुलनेत नवं गाणं फारचं खराब असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहे.  दोन्ही गाण्यांची प्रेक्षक दणकून तुलना करत आहेत.

नवीन गाणं आणि जुन्या गाण्यात काय फरक आहे?

फाल्गुनी पाठकचं ओरिजिनल गाण हे 1999मध्ये रिलीज झालं होतं. या गाण्यात अभिनेता विवान भटेना आणि निखिला पलटन यांनी अभिनय केला होता. या म्युझिक व्हिडीओमध्ये एका कॉलेज फेस्टिव्हलमध्ये पपेट शो दाखवण्यात आला होता. तर इथे नेहा कक्कर वर्जनमधील गाण 19 सप्टेंबरला रिलीज झालं आहे. ज्यात नेहा कक्करनं गाण्याची हुक लाइन आणि म्युझिकचा वापर केला आहे.

त्याचप्रमाणे ओरिजिनल गाण्यासह नेहानं तिच्या काही लिरिक्सही अ‍ॅड केल्या आहेत.  नवं वर्जन अभिनेत्री प्रियांका शर्मा आणि धनश्री वर्मा यांच्यावर शुट करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Navratri