S M L

आमिरशी टक्कर घ्यायला फैझल खान तयार

आमिर खानशी टक्कर घ्यायला सज्ज झालाय त्याचाच भाऊ फैझल खान. आमिरचा 'सिक्रेट सुपरस्टार'च्याच दिवशी फैझल खानचा 'डेंजर' रिलीज होतोय.

Sonali Deshpande | Updated On: Mar 30, 2017 12:43 PM IST

आमिरशी टक्कर घ्यायला फैझल खान तयार

30 मार्च : आमिर खानशी टक्कर घ्यायला सज्ज झालाय त्याचाच भाऊ फैझल खान. आमिरचा 'सिक्रेट सुपरस्टार'च्याच दिवशी फैझल खानचा 'डेंजर' रिलीज होतोय.

आमिरचा सिनेमा रिलीज होण्याच्या वेळी क्वचितच दुसरा सिनेमा रिलीज करायचं डेरिंग केलं जातं. संजय दत्तनंही त्याच्या 'भूमी'ची तारीख म्हणूनच बदलली. पण आमिरच्या भावाला यातलं गांभीर्य कळलं नाहीय का? कारण 4 आॅगस्टलाच दोन्ही सिनेमे रिलीज होतायत.

'डेंजर' हा भयपट आहे. त्यात एका हाॅटेलचा मालक हाॅटेलमध्ये येणाऱ्यांनाच तो मारून टाकतो. फैझल या सिनेमात स्टाॅक ब्रोकरच्या भूमिकेत आहे. तो या हाॅटेलमध्ये आपल्या बायकोसोबत येतो आणि फसतो.

फैझल खानलाही सिनेमा स्वत:च्या वाढदिवसाला रिलीज करायचा होता. म्हणजे 3 आॅगस्टला. पण आता प्राॅडक्शनच्या कामामुळे तो 4 आॅगस्टलाच रिलीज होणार.

एकूणच या बाॅक्स आॅफिसच्या युद्धात सुपरस्टार कोण ठरतंय आणि ही टक्कर कोणाला डेंजरस ठरते, ते आॅगस्टमध्येच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2017 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close