Fact Check : अमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे काय आहे सत्य?

Fact Check : अमिताभ बच्चन आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या त्या फोटोचे काय आहे सत्य?

जया बच्चन यांनी लोकसभेत ड्रग्जबाबत केलेल्या वक्तव्यानंतर हा फोटो खूप व्हायरल झाला असून वापरकर्ते बिग बींना ट्रोल करीत आहेत

  • Share this:

मुंबई, 19  सप्टेंबर : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. या फोटोत बिग बी एका व्यक्तीसोबत हात मिळवत असताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अमिताभ बच्चन यांना हात मिळवणारा हा व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) असल्याचा दावा करण्यात आले आहे.

ज्यानंतर अनेकांचं म्हणणं आहे की फोटोत दिसणारी व्यक्ती हुबेहुब दाऊद (Amitabh Bachchan With Dawood) प्रमाणे दिसत आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे युजर्स अमिताभ बच्चन यांना ट्रोल करीत आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोला 'रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, पर मैं आपका गुलाम हूं.' अशी कॅप्शन दिली आहे. तसं पाहता हा फोटो जुना आहे. मात्र आता जया बच्चन यांनी राज्यसभेत बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणात वक्तव्य केल्यानंतर हो फोटो व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

... be safe .. and be in protection ..

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

या फोटोबाबत अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन पुढे आला असून त्याचे या फोटोमागचे सत्य सांगितले आहे.  एका ट्विटर युजरने शेअर केलेल्या फोटोला उत्तर देताना अभिषेक बच्चनने लिहिलं आहे की, दादा हा फोटो माझे वडील अमिताभ बच्चन आणि महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांचा आहे. अभिषेक बच्चनने याचे उत्तर दिल्यानंतर युजरने हा फोटो डिलीट केला आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोत अमिताभ बच्चन यांच्यासह दाऊद इब्राहिम नाही तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: September 19, 2020, 11:30 AM IST

ताज्या बातम्या