मुंबई 29 मार्च: काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. दिल्लीत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीला वारंवार मारलं जातंय तो काहीसा बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसारखा (Ajay Devgn) दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर अजयला दिल्लीत काही गुंडांनी मारलं अशा बातम्या सर्वत्र पसरवल्या जात आहेत. (viral video) मात्र या व्हिडीओवर अखेर अजयच्या प्रवक्त्यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी या व्हायरल व्हिडीओचं सत्य सांगितलं. (Fact Check viral video)
अजय देवगणचे प्रवक्ता म्हणाले, या व्हिडीओमधील व्यक्ती अजय नाही. ही घटना दिल्लीतील आहे. अन् गेलं वर्षभर अजय दिल्लीत गेलेला नाही. तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय शेवटचा दिल्लीत गेला होता. त्यामुळं त्याचं नाव वापरुन कुठल्याही अफवा पसरवू नये अशी विनंती त्यांनी नेटकऱ्यांना केली. दिल्लीत घडलेल्या घटनेचा अजयशी काहीही संबंध नाही. त्या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला अजय ओळखत नाही. तरी देखील जर कोणी अजयचं नाव वापरुन खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात अधिकृत तक्रार केली जाईल. असाही इशारा प्रवक्त्यांनी दिला.
अवश्य पाहा - चित्रपटात ऐश्वर्याला किस का करत नाही? अभिषेक बच्चन म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये...’
Not really sure if this is #ajaydevgan or not but #Kisanektamorcha agitation seems to be spreading up. Social media floating with this video that drunk @ajaydevgn got beaten up?? #RakeshTikait pic.twitter.com/Fv8j0kG5fv
— lalit kumar (@lalitkumartweet) March 28, 2021
अवश्य पाहा - पाहा देवमाणूसमधील मायराचं बॉलिवूड कनेक्शन; सलमान-वरुणसोबत केलंय काम
व्हायरल होणारा हा व्हिडीओ ट्विटरवर एका युझरनं पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये मारामारी करणारा व्यक्ती अजय देवगणसारखा दिसतोय असा दावा त्यानं केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या व्हिडीओवर व्यक्त होऊ लागला. या प्रकरणामुळं अजयला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. त्यामुळं अखेर त्याच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी प्रवक्त्यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.