मुंबई २५ जुलै: पूर्व पॉर्नस्टार मिया खलिफाने (Mia Khalifa) नुकतीच तिच्या चाहत्यांना हैराण करणारी एक बातमी दिली आहे. तिने तिचा पती रॉबर्ट सॅन्डबर्गसोबत (Robert Sandberg) घटस्फोट घेतला आहे. 2019 साली मिया आणि रॉबर्ट एन्गेज (Mia Khalifa Enngagement) झाले होते. 2 वर्षांपासून ते एकत्रच होते. तर मागील वर्षी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते एकमेकांपासून वेगळे झाले आहे.
मियाने सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट लिहून ते वेगळे झाले असल्याचं सांगितलं. त्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी यावर चिंताही व्यक्त केली. (Mia Khalifa Divorced)
यांसदर्भात मियाने तिच्या सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिने म्हटलं आहे की, ‘आम्ही नेहमी एकमेकांवर प्रेम करू तसेच एकमेकांचा आदर करू’, तसेच तिने असही म्हटलं की, ‘आम्ही मागील वर्षभरापासून आमचं लग्न वाचवण्याचा फार प्रयत्न केला ,आम्ही आमचं सगळं काही दिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही.’ अशी मोठी पोस्ट लिहून तिने तिच्या पूर्व पतीलाही टॅग केलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान जुन 2020 मध्येच ते लग्न करणार होते. पण लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे त्यांनी धुमधडाक्यात लग्न केलं नाही. तर घरीच त्यांनी साधेपणाने लग्न झालं असं घोषित केलं होतं. तर लॉकडाऊननंतर ते धुमधक्यात रिसेप्शन देणार होते. पण त्याआधीच आता ते विभक्त झाले आहेत.
View this post on Instagram
मियाने काही वर्षांपूर्वी पॉर्न इंड्स्ट्री सोडली होती. आणि त्यानंतर तिने वेगळं आयुष्य सुरू केलं होतं. रॉबर्टसोबत ती अनेकदा फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करायची.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Bold photoshoot, Porn star