मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एक्स बॉयफ्रेंड युवराज सिंहने किम शर्माची उडवली खिल्ली; HOT बिकीनी PHOTO पाहून म्हणाला...

एक्स बॉयफ्रेंड युवराज सिंहने किम शर्माची उडवली खिल्ली; HOT बिकीनी PHOTO पाहून म्हणाला...

किमचा तो फोटो खूप ट्रोल झाला आहे

किमचा तो फोटो खूप ट्रोल झाला आहे

किमचा तो फोटो खूप ट्रोल झाला आहे

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 25 ऑक्टोबर : किम शर्माने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या खूप चर्चा सुरू आहे. चर्चेचं कारण त्या फोटोवर केलेली कमेंट आहे. त्याचं झालं असं की अभिनेत्री किम शर्माने कोरोनाच्या पूर्वीचा एका फोटो शेअर केला आहे. मास्कशिवाय व कोरोनाच्या भीतीशिवाय बीचवर मजामस्ती केल्याच्या आठवणीचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. किमने नुकताच थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. मात्र तिच्या एक्स बॉयफ्रेंड युवराज सिंहने तिचा फोटो ट्रोल केला आहे. किमच्या या फोटोची अनेकजण कौतुक करीत असताना दुसरीकडे युवजार सिंह याने तिला ट्रोल केलं आहे. युवराजने कमेंट केली आहे की, गाव बसा नही और बस्ता लेकर पहुंच गयी मॅडम...युवराजच्या या कमेंटवर किमने प्रतिक्रिया दिली आहे. तिले  लिहिलं आहे की, - इंग्रजीत प्लीज...! रिपोर्ट्सनुसार किम आणि युवराज काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करीत होते. त्यानंतर 2007 मध्ये दोघे वेगळे झाले. सध्या किम सिंगल आहे आणि युवराज सिंह हेचल कीचसोबत आपले वैवाहिक जीवन इन्जॉय करीत आहे. किम आणि युवराज चांगले मित्र आहेत. गेल्या वर्षी युवराजच्या रिटायरमेंट पार्टीत किम सहभागी झाली होती.
View this post on Instagram

What’s better than a day at the beach? #notmuch #flashback 🌊

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

नुकतीच किम गोव्यात वेकेशनसाठी गेली आहे. गोव्यातील तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तिने पूलाजवळ ऑरेंज रंगाची बिकिनी घातली आहे. किमच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचं झालं तर तिने 2000 मध्ये मोबब्बते चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केलं. ताज महल, फिदा, कुडियो का है जमाना...ती शेवटी तेलगु चित्रपट यागममध्ये दिसली होती, जो 2010 मध्ये रिलिज झाला होता.
First published:

Tags: Yuvraj singh

पुढील बातम्या