VIDEO: शिल्पा शेट्टी करत होती Christmas Tree ची सजावट; अचानक मुलगा आला अन्...

VIDEO: शिल्पा शेट्टी करत होती Christmas Tree ची सजावट; अचानक मुलगा आला अन्...

शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) घरी ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या वेळी शिल्पाचं डेकोरेशन (Decoration) पूर्ण होण्यापूर्वीच कुणीतरी शिल्पाच्या क्रिसमस ट्री ची कॅण्डी (Candi) खाल्ली आहे.

  • Share this:

मुंबई,13 डिसेंबर: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) प्रत्येक फेस्टिव्हल (Festival) मोठ्या उत्साहात साजरा करते. ख्रिसमस (Christmas) तर शिल्पाच्या फेव्हरेट फेस्टिवल्स पैकी एक आहे. दरवर्षी शिल्पा ख्रिसमस सेलिब्रेशनची (Christmas Celebration) मोठी तयारी करते. तसेच  स्वतःच्या सेलेब्रेशनचे (Celebration) फोटो ती तिच्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर करते. पण या वेळी ख्रिसमसच्या काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या सोशल मीडियावर तिच्या क्रिसमस ट्रीचं कॅण्डी खाल्ल्याची पोस्ट शेअर केली आहे.

दरवर्षी शिल्पा तिचा मुलगा वियान बरोबर ख्रिसमस ट्री (Christmas Tree) डेकोरेट करते. यावर्षी तिने केलेल्या या पोस्टमध्ये वियान ख्रिसमस ट्रीची कॅण्डी कॅन खाताना दिसत आहे. यावर शिल्पाने कॅप्शन दिलं आहे, 'मला आणि विआनला दरवर्षी एकत्र येऊन ख्रिसमस ट्री ची करायला आवडते.'

शिल्पा शेट्टी कायमच सोशल मीडियावर (Social Media) अ‍ॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर (Instagram) तिचे 2 कोटींच्या जवळपास फॉलोअर्स (Followers) आहेत. शिल्पा तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या सोशल मीडिया पेज वरून देताना दिसते. तसेच शिल्पा शेट्टी लवकरच पुन्हा एकदा  मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे.

सेलेब्रिटीसच्या  मुलांचे  फोटो कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्राचा मुलगा वियान मात्र सोशल मीडियावर फार चर्चेत नसतो. पण शिल्पा कायमच वियान बरोबरचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करताना दिसते.

Published by: News18 Desk
First published: December 13, 2020, 6:03 PM IST

ताज्या बातम्या