मुंबई, 10 एप्रिल: बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) दोघंही सोशल मीडियावर बऱ्याचदा एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून टीका करत असतात. या दोन्ही अभिनेत्रींच्या वादाच्या दरम्यान सोशल मीडियातून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अभिनेत्री कंगना रणौतला धन्यवाद (Taapsee pannu thanked to Kangana ranaut) देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, कंगनाही स्वत: ला रोखू शकली नाही आणि तिनेही ट्विटरवर आपली प्रतिक्रिया (Kangana's Reply) दिली आहे.
वास्तविक, तापसी पन्नुला 'थप्पड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून 2021 चा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर, तापसीनं व्यासपीठावरून एक छोटंस भाषण केलं आहे. ज्यामध्ये ती काही लोकांचे आभार मानताना दिसत आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या शर्यतीत तापसीसोबत दीपिका पादुकोण, जान्हवी कपूर, विद्या बालन यांच्यासह कंगना राणौत देखील होती. त्यामुळे हा पुरस्कार जिंकल्यानंतर तापसीनं कंगना रणौतसह शर्यतीतील अन्य अभिनेत्रीचे देखील आभार मानले आहेत.
View this post on Instagram
तापसी पन्नूचा हा व्हिडीओ काही तासातचं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तापसीबरोबरच कंगनाचे चाहतेही या व्हिडीओला वेगाने शेअर करत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताना एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर कंगनाला टॅगही केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी कंगना स्वत: ला रोखू शकली नाही. तिने लिहिलं की- 'थँक्स यू तापसी, तु फिल्मफेअर पुरस्कारासाठी पात्र आहेस. तुझ्यापेक्षा कोणीही या पुरस्कारासाठी पात्र नाही.'
Thank you @taapsee well deserved Vimal elaichi filmfare award.... no one deserves it more than you 🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 9, 2021
हे वाचा- VIDEO : इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या तापसीला प्रेक्षकानं दिला हिंदी बोलण्याचा सल्ला आणि...
कंगनाची ही प्रतिक्रिया पाहून लोकांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही लोक असा विचार करत आहेत की, कदाचित दोघांतील वाद मिटला असून त्यांच्यात सर्वकाही ठीक झालं आहे. तर काहींच्या मते कंगनाने आपला मोठेपणा दाखवला आहे. अलीकडेच कंगनाने एका पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिनं म्हटलं होतं की, बॉलिवूडमधील कोणतीही अभिनेत्री तिच्या कामाची प्रशंसा करत नाही. तरीही तिने आलिया, दीपिका, करीनासह बर्याच अभिनेत्रीच्या कामाचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.