हिरोला 442 रुपयांना 2 केळी देणं भोवलं, हॉटेलला इतक्या हजारोंचा फटका

हिरोला 442 रुपयांना 2 केळी देणं भोवलं, हॉटेलला इतक्या हजारोंचा फटका

अभिनेता राहुल बोसकडून फक्त दोन केळ्यांचे 442 रुपये वसूल करणं JW Mariott हॉटेलला खूप महागात पडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : अभिनेता राहुल बोसकडून फक्त दोन केळ्यांचे 442 रुपये वसूल करणं JW Mariott हॉटेलला खूप महागात पडलं आहे. उत्पादन शुल्क व कर विभागानं या हॉटेलवर कारवाई करत सीजीएसटीच्या कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या विभागानं सूट मिळणाऱ्या वस्तूवर अवैध टॅक्स वसूली केल्याबद्दल हॉटेलला 25 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता राहुल बोसनं चंदीगढच्या एका हॉटेलमध्ये आलेला एक अनुभव ट्विटरद्वारे शेअर करत या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

राहुलनं त्याच्या अनुभवाविषयी लिहिलं, यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला हे पाहावं लागेल. कोण म्हणतं फळ तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक नाही. JW Mariott हॉटेलवाल्यांना विचारा. व्हिडिओमध्ये राहुलनं सांगितलं की, तो हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होता. त्यावेळी त्यानं 2 केळी ऑर्डर केली. त्यानंतर त्याला जे बिल आलं ते पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. या हॉटेलनं त्याला 2 केळ्यांसाठी जवळपास साडेचारशे रुपयांचं बिलं दिलं होतं. त्यानंतर राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

एका अफवेमुळे बदललं धनुषचं आयुष्य, असा झाला सुपस्टार रजनीकांत यांचा जावई

राहुलच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी राहुलची बाजू घेतली तर काहींनी मात्र जर तुला 5 स्टार हॉटेलचं बिल भरता नाही येत तर मग अशा हॉटेलमध्ये जाऊ नकोस असा उपरोधिक सल्ला राहुलला दिला. एका युजरनं लिहिलं, ‘JW Marriot तुम्ही तुमच्या पाहुण्याकडून चुकीचा GST वसूल करून अशी वागणूक देता का? मला वाटतं तुम्ही अशाप्रकारे धोका देत अनेकांकडून लाखो रुपये कमवले असतील. ही तर भरदिवसा होणारी लुटमार आहे.’

भर पावसातही मलायका निघाली योगा क्लासला, दिसला नो मेकअप लुक

तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘तुम्ही एका महागड्या हॉटेलमध्ये सर्वात लक्झरी रुममध्ये राहत आहात. मग एका केळ्याच्या किमतीसाठी का रडता. एका रात्रीसाठी तुम्ही 25 हजार देणं बरोबर आहे. जेव्हा तुमच्या देशातल्या अनेक लोकांचा पगार हा याच्या निम्मा आहे. ते तुमच्याकडून पैसे घेतात करण तुम्ही त्यांना पैसे देता.’

पिवळ्या साडीवाल्या 'त्या' महिला ऑफिसरचा Tik Tok Video व्हायरल

अनेकांनी या लक्झरी हॉटेल्सच्या अवाजवी किमतींवर प्रश्न केला आहे. एका युजरनं लिहिलं, मला माहित नव्हतं की, सेलिब्रिटी टॅग या किंमतीसोबत येतो. तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, जर तुम्ही बनाना शेक मागवला असता तर त्याची किंमत आयफोनच्या बरोबर असेल. तर आणखी एका युजरनं यावर लिहिलं, प्रश्न हा आहे की यांनी ही केळी ऑस्ट्रेलियातून इन्पोर्ट केले होते का? तर, बरं झालं तुम्ही व्हिडिओ शेअर केला. कमीत कमी आम्हाला समजलं तरी भविष्यात आम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठे नाही.

=========================================================================

सिंघम स्टाईलमुळे पोलिसांची नोकरी धोक्यात, VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या