मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ईशा गुप्ताला कोरोनाची लागण ; इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती

ईशा गुप्ताला कोरोनाची लागण ; इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली आहे.

  मुंबई, 9 जानेवरी- देशासह राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बॉलिवूडला देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सना कोरोनाची लागण झाली आहे. आता या यादीत आणखी एक नावाची भर पडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला (Esha Gupta) कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे आणि सर्व प्रोटोकॉल पाळत आहे. काय म्हटलं आहे ईशाने पोस्टमध्ये.. ईशानं इन्स्टा पोस्ट करत कोरोना  (esha gupta tested covid positive )झाल्याची माहिती दिली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सर्व सुरक्षा नियमांचे पालन करूनही मला कोरोनाची लागण झाली आहे. मी सर्व कोरोना नियमांचे पालन करत आहे आणि स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे. मला आशा आहे की, मी यापेक्षा मजबूत बनून परत येईन. तुम्ही सर्व सुरक्षित रहा आणि मास्क घाला. स्वतःची खूप काळजी घ्या. ईशा गुप्ता पोस्ट
  ईशा गुप्ता पोस्ट
  ईशा गुप्ताने तिच्या करिअरची सुरूवात 2012 मध्ये आलेल्या 'जन्नत 2' या सिनेमातून केली होती. या सिनेमात तिच्यासोबत इमरान हाशमी प्रमुख भूमिकेत होता., या चित्रपटानंतर ईशा 'राझ 3 डी', 'चक्रव्यूह', 'गोरी तेरे प्यार में', 'हमशकल्स', 'बेबी', 'मैं राहूं या ना राहूं', 'रुस्तम', 'कमांडो 2', 'बादशाहो'. 'पलटन' आणि 'टोटल धमाल' या चित्रपटात दिसली. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटातील तिच्या बोल्ड लुक आणि किसिंग सीनमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. वाचा-घटस्फोटावर आमिर अली -संजीदा शेखची अशी होती पहिली प्रतिक्रिया.. यासोबतच ईशा गुप्ता 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणार आहे. 'आश्रम' वेब सीरिजचे दोन्ही भाग हिट ठरले आहेत. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ईशा गुप्ता (Esha Gupta) सोशल मीडियावर नेहमी  सक्रिय असते. ती तिचा बॉयफ्रेंड Manuel Campos Guallar याच्यासोबतचे काही फोटो शेअर करत असते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या