News18 Lokmat

‘असं वाटत होतं की तो डोळ्यांतून बलात्कार करत आहे..’ अभिनेत्रीने व्यक्त केलं दुःख

सुरक्षा रक्षकांनी त्याला तीनवेळा रोखलं पण तरीही तो कोणाचंच ऐकला नाही. शेवटी त्याला बाहेर काढण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 04:49 PM IST

‘असं वाटत होतं की तो डोळ्यांतून बलात्कार करत आहे..’ अभिनेत्रीने व्यक्त केलं दुःख

मुंबई, 07 जुलै- अभिनेत्री इशा गुप्ता वन डे जस्टीस डिलीवर्ड या सिनेमानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इशाने हॉटेलिअरला त्याच्या असभ्य वागणुकीमुळे चांगलेच सुनावले आहे. सोशल मीडियावर इशाने हॉटेल व्यावसायिक रोहित विगच्या असभ्य वर्तवणुकीचा अनुभव शेअर केला. ट्विटरवर इशाने लिहिले की, ती आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत पार्टी करत होती. तेव्हा हॉटेलमधील एका व्यक्तिने कशा प्रकारे तिच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तवणुक केली याबद्दल सांगितले आहे. इशा म्हणाली की, तिलाजणू रोहित डोळ्यांनी बलात्कार करत असल्याचा वाईट अनुभव आला.

इशाने लिहिले की, ‘रोहित विग या व्यक्तिची बॉडी लँग्वेज तिला खराब आणि असुरक्षित करून देत होती. जर मलाच एवढं असुरक्षित वाटत असेल तर इतर मुली कशा घराच्या बाहेर पडू शकतात. रोहितसारख्या मुलांना चांगली अद्दल घडली पाहिजे.’

Loading...

एवढंच नाही तर इशाने एक व्हिडिओही शेअर केला. यात तिने म्हटलं की, सुरक्षा रक्षकांनी त्याला तीनवेळा रोखलं पण तरीही तो कोणाचंच ऐकला नाही. शेवटी त्याला बाहेर काढण्यात आलं. इशासोबत तिचे दोन सुरक्षा रक्षकही होते. तसेच हॉटेलच्या कॅमेऱ्यांमध्येही ही सर्व घटना दिसत आहे. तसेच लोकांच्या मदतीने तिने या व्यक्तिचं नाव आणि पत्ता शोधून काढला. याचं नाव रोहित असून तो गोव्यातील सेंट रेगिस हॉटेलचा मालक आहे.

इशाच्या या पोस्टवर अनेक युझर्सनी ती आगामी सिनेमासाठीचं प्रमोशन करत असल्याचा आरोप केला. तर इशानेही ट्रोलर्सना उत्तर देत महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

सामन्या दरम्यान पंजाबी गाण्यावर थिरकली अनुष्का शर्मा, पाहा VIDEO

VIDEO- विराटच्या चौकारावर अनुष्काने विचारले, ‘फोर का सिग्नल क्या होता है...’

VIDEO- बॉल पूलमध्ये फसली Sushmita Sen, बॉयफ्रेंड रोहमन शॉलने अशी केली मदत

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: esha gupta
First Published: Jul 7, 2019 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...