डोहाळे जेवणाच्या दिवशीच ईशा देओल पुन्हा बोहल्यावर

डोहाळे जेवणाच्या दिवशीच ईशा देओल पुन्हा बोहल्यावर

27 आॅगस्टला डोहाळे जेवणाच्या दिवशीच ती लग्न करतेय.

  • Share this:

22 आॅगस्ट : हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल सध्या गर्भवती आहे. पण आई होण्याआधी ती पुन्हा एकदा लग्न करणार आहे. दचकलात ना?  आणि या गोष्टीला तिच्या आईचा पूर्ण पाठिंबा आहे.

झालं असं की ईशा आणि तिचा नवरा भरत तख्तानी यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा हेमा मालिनीनं तामिळ पंडित बोलावला होता. त्यानं लग्नाचे मंत्र तामिळमध्ये म्हटले. आणि इतरांना सोडा पण खुद्द नवरा-नवरीला त्याचा अर्थ काही कळला नाही. म्हणून पुन्हा एकदा हिंदी भाषिक भटजीला बोलावून लग्न करायचंच असा हट्ट होता ईशाचा. तिचे हे डोहाळे तिची आई पुरवणारच.

म्हणून 27 आॅगस्टला डोहाळे जेवणाच्या दिवशीच ती लग्न करतेय. ईशा मोठ्या पडद्यापासून दूर राहिली, तरी सोशल मीडियवर नेहमीच अॅक्टिव असते.

First published: August 22, 2017, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading