अभिनेत्री ईशा देओल दुसऱ्यांदा झाली आई, मुलीचं नाव ठेवलं...

अभिनेत्री ईशा देओल दुसऱ्यांदा झाली आई, मुलीचं नाव ठेवलं...

ईशा आणि भरतनं आपल्या दुसऱ्या मुलीच्या जन्माची गोड बातमी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली.

  • Share this:

मुंबई, 11 जून : अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानी पुन्हा एकदा आई-बाबा झाले असून ईशानं 10 जूनला एका गोंडस मुलीला जन्म दिला. ईशा आणि भरत यांना याआधीही राध्या नावाची एक मुलगी आहे. ईशा आणि भरतनं आपल्या दुसऱ्या मुलीच्या जन्माची गोड बातमी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली. ईशानं मुलीचं नाव मीयारा तख्तानी असं ठेवलं असून तिनं सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी धन्यवाद दिले आहेत. ईशानं ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं जानेवारी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलं होतं.

सुमित राघवनच्या संतापानंतर मनपाच्या हालचाली, नाट्यगृहात जॅमर बसवणार?

 

View this post on Instagram

 

Thank you very much for the love & blessings ♥️ @bharattakhtani3 #radhyatakhtani #mirayatakhtani

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on

प्रेग्नंसी दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत ईशानं तीची मुलगी राध्या मोठी बहीण बनण्यासाठी किती उत्सुक आहे हे सांगितलं होतं. ईशा म्हणाली, कधी कधी राध्या येते आणि माझ्या पोटावर किस करते. भरत आणि मी जेव्हा तिला बेबीला हॅलो करण्यासाठी सांगतो. तेव्हा ती तसं करते आणि पोटावर किस करते. राध्याला तिची एक बाहुली खूप आवडते. ती त्या बाहुलीला बॉटल मधून दूध पाजते. तिला असं खेळताना पाहून मी विचार करते की ती तिच्या लहान बहीण किंवा भावाला कसं सांभाळेल. हा अनुभव आमच्यासाठी एक नवा असणार आहे.

बाथरूममध्ये पडून चाहत्याचा अपघाती मृत्यू, बातमी ऐकून रणवीर झाला भावुक

काही दिवसांपूर्वीच ईशानं तिच्या बेबी शॉवरचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर काल ईशाच्या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. ईशा आणि भरतनं 2 वेळा लग्न केलं आहे. पहिल्यांदा ते 29 जून 2012 ला विवाहबद्ध झाले होते मात्र त्यानंतर 24 ऑगस्ट 2017 ला त्यांनी पुन्हा एकदा लग्न केलं. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2017 ला राध्याचा जन्म झाला होता. ईशाला लवकरच डिस्चार्ज मिळून ती घरी परतेल. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशाचे आई-वडील हेमा मालिनी आणि धर्मेंद्र सुद्धा खूप खुश आहेत. अद्याप ईशानं हॉस्पिटल मधील कोणताही फोटो शेअर केला नसला तरी लवकरच तिच्या चाहत्यांना बाळाची पहिली झलक पाहायला मिळेल.

VIRAL VIDEO : बँकॉकच्या गल्लीत कपडे विकताना दिसली ‘भारत’ची ही अभिनेत्री

First published: June 11, 2019, 1:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading