'तू तर अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस'; हटके लुकमुळे अभिनेत्री झाली ट्रोल

स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून प्रियांका घराघरात पोहचली आहे.

स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून प्रियांका घराघरात पोहचली आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 जून- मनोरंजन क्षेत्रातील कलाकार नेहमीचं काहीतरी वेगळं करत असतात. यामुळे कधी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो, तर कधी त्यांना ट्रोलदेखील (Troll) व्हावं लागतं. बऱ्याचवेळा अभिनेत्रीनां आपल्या हटके स्टाईलमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असचं काहीसं झालं आहे, अभिनेत्री प्रियांका उध्वानीसोबत (Priyanka Udhwani). प्रियंकाने नुकताच आपल्या बॉयफ्रेंडसोबत एक बोल्ड फोटो शेयर केला आहे. मात्र तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला.
    स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधून प्रियांका घराघरात पोहचली आहे. या मालिकेत ती करिश्माची व्यक्तिरेखा साकारत आहे. प्रियांकाचं याच मालिकेतील सह कलाकाराशी सूत जुळलं आहे. या मालिकेतील नमन म्हणजेच अभिनेता अंशुल पांडे आणि प्रियांका एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे सतत आपले खाजगी फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतात. त्यांच्या चाहत्यांना त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात पसंतसुद्धा पडतात. (हे वाचा:HBD: 'त्याने मला कपडे काढून'...सोनल वेंगुर्लेकरसोबत घडला होता धक्कादायक प्रसंग  ) प्रियांका आणि अंशुल सोशल मीडियावर बरेच सक्रीय असतात. प्रियांकाने नुकताच आपल्या सोशल मीडियावर अंशुलसोबत एक बोल्ड फोटो शेयर केला आहे. यामध्ये दोघेही काळ्या रंगाच्या कोटमध्ये दिसत आहेत. समोरून ओपन असणाऱ्या या कोटमध्ये प्रियांका खुपचं बोल्ड दिसत आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुक होतं आहे. तर काही युजर्स ट्रोलसुद्धा करत आहेत.काहींनी कमेंट करत प्रियांका ला हॉट म्हटलं आहे, तर एकाने ट्रोल करत म्हटलं आहे, ‘तू अंतर्वस्त्रे घालायला विसरलीस, लाज वाटते तुझी’. अशा भाषेत प्रियांकाला ट्रोल केलं आहे. अशा पद्धतीने प्रियांका उध्वानीचं नव्हे तर याआधी अनुषा दांडेकर, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा ट्रोल झाल्या आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published: