Home /News /entertainment /

सोशल मीडियावर तुफान VIRAL झालेली ही जोडी आहे तरी कोण? वाचा सविस्तर

सोशल मीडियावर तुफान VIRAL झालेली ही जोडी आहे तरी कोण? वाचा सविस्तर

हे दोघेही सोशल मीडियावर आपल्या ड्यूएट गाण्यांचे व्हिडीओ शेयर करत आहेत.

  मुंबई, 17 जून- अलीकडे सोशल मीडियामुळे कोणतीही व्यक्ती पटकन प्रसिद्धीच्या झोतात येते. असचं काहीसं झालंय, सचेत टंडन (Sachet Tandon) आणि परंपरा ठाकूर(Parmpara Thakur)  या जोडीसोबत. हे जोडपं सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. आपल्या जादुई आवाजाने सर्वांनाचं भुरळ पाडत आहे. या दोघांच्या गाण्याचे व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल (Viral Video) होतं आहेत. पाहूया हे जोडपं नेमकं आहे तरी कोण?
  सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर या दोघांनी एका टीव्ही शोमधून आपल्या करीयरची सुरुवात केली होती. छोट्या पडद्यावरील सिंगिंग शो ‘द वॉइस’ च्या पहिल्या पर्वात हे दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. आपल्या आवाजाच्या जोरावर हे दोघे फायनल 4 मध्ये पोहचले होते. या शोनंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते. काहीकाळ एकमेकांना डेट करून 2020 मध्ये या दोघांनी लग्न केलं आहे.
  शाहिद कपूर आणि कियारा अडवानी यांच्या सुपरहिट ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील सुपरहिट गाणं बेखयाली हे यांनीचं गायिलं आहे. तसेच अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरच्या ‘टॉयलेट’ या चित्रपटातील काही गाणीसुद्धा या दोघांनी गायिली आहेत. तसेच त्यांना संगीतसुद्धा दिलं आहे. परंपराने तर आपल्या दमदार आवाजात श्रद्धा कपूर आणि वरून धवनच्या ‘स्ट्रीट डान्सर’ चित्रपटातील मुकाबला गाणं म्हटलं आहे. (हे वाचा:VIDEO: शकूने नलुला दिलं खास सरप्राईज; पाहून स्वीटूचं कुटुंब झालं भावुक  ) या जोडप्याला खरी ओळख आपल्या व्हिडीओमुळे मिळत आहे. हे दोघेही सोशल मीडियावर आपल्या ड्यूएट गाण्यांचे व्हिडीओ शेयर करत आहेत. आणि चाहत्यांनाकडून त्यांना भरभरून दाद मिळत आहे. या दोघांच्या ‘मीरा के प्रभू’ या व्हिडीओला तब्बल 3 करोडपेक्षा जास्त लोकांनी पहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त या जोडप्याचीच चर्चा आहे. आज प्रत्येक तरुण-तरुणी आपल्या स्टेट्सला या दोघांचे हे व्हिडीओ लावून यांच्यावरचं प्रेम व्यक्त करत आहे. आणि यांच्या दमदार आवाजाला दाद देत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Playback singer, Video viral

  पुढील बातम्या