मुंबई, 13 ऑगस्ट- सोशल मीडिया एक असं माध्यम बनलं आहे, की एका रात्रीत अगदी सर्वसामन्य लोकांना स्टार बनवू शकतं. असचं काहीसं झालं ‘बसपन का प्यार’ (Bachapan Ka Pyar) फेम सहदेव दिरदोसोबत(Sahadev Dirdo). या छोट्याशा मुलाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला, आणि त्या व्हिडीओने त्याला स्टार बनवलं. या व्हिडीओची दखल घेत बॉलिवूड गायक बादशाहने त्याच्यासोबत हे गाणं रेकॉर्ड केलं आहे. आणि आता हे गाणं देशभरामध्ये धुमाकूळ घालत आहे. सध्या फेमस झालेला हा चिमुकला मुंबईतील जुहू बीचवर (Juhu Beach) मजामस्ती करताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक छोटासा मुलगा ‘बसपन का प्यार’ हे गाणं म्हणताना दिसून येतं होतं. हा एक शाळकरी मुलगा होता. आणि या व्हिडीओमध्ये तो एका शाळेत असल्याचं दिसत होतं. हा मुलगा म्हणजेच सहदेव दिरदो होय. त्याच्या त्या निरागस गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सर्व कलाकार आवर्जून या व्हिडीओवर रील करताना दिसून येत होते. सोशल मीडियावर ‘बसपन का प्यार’ या गाण्याचा ट्रेंडचं सुरु आहे.
(हे वाचा: करीनाने नव्या घराच्या गृहप्रवेशाची स्वतः केली होती तयारी; PHOTO होतोय VIRAL )
या व्हिडीओची दखल घेत. बॉलिवूड गायक बादशाहने आस्था गिलसोबत मिळून आणि सहदेवला घेऊन हे गाणं रेकॉर्ड केलं आहे. आणि आता हे गाणं जोरदार हिट ठरत आहे. या गाण्यामुळे सहदेव दिरदोचं आयुष्यचं बदलून गेलं आहे. सध्या सहदेव जुहू बीचवर धम्माल करताना दिसत आहे. बिचवरील त्याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल होतं आहे. सहदेव इतकं फेमस झाला आहे. की आत्ता अनेक पापाराझी त्याला आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी त्याच्या मागावर असतात. या व्हिडीओमध्ये सहदेव क्रिकेटचा आनंद घेताना दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment