मुंबई, 14 ऑगस्ट- छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehata Ka Oolta Chashma) ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका आपलं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनात घर करून गेलं आहे. त्यामुळे हे प्रत्येक पात्र दर्शकांना आपलसं वाटतं. यातीलचं एक पात्र म्हणजे भिडे गुरुजींची सोनू (Sonu) होय. मालिकेतील पहिली सोनू म्हणजेच झील मेहतानेही(Jheel Mehata) आपल्या अभिनयाने चाहत्यांवर आपली छाप पाडली होती. मात्र हिच सोनू सुरुवातीला बॉडी शेमिंगला बळी पडली आहे.
View this post on Instagram
कलाकारांना चाहत्यांकडून जितकं प्रेम मिळत, तितकचं त्यांना ट्रोलदेखील केलं जातं. प्रसिद्ध विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये टप्पूच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी आणि गोकूलधाम मधील भिडे गुरुजीची मुलगी सोनू, म्हणजेच अभिनेत्री झील मेहतासुद्धा बॉडी शेमिंगला बळी पडली आहे. झीलने नुकताच आपल्या या वाईट अनुभवाबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकताच झीलने एक व्हिडीओ शेयर करत म्हटलं आहे, ‘एखादी व्यक्ती सुंदर असण्यासोबतचं, खाससुद्धा असते...’
(हे वाचा: BB OTT: नेहा भसीनने रिद्धिमा पंडितला केलं KISS; आणि त्यानंतर जे घडलं...)
झीलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर करत म्हटलं आहे, ‘अनेक लोक तिला वाईट कमेंट्स करत होते. कधी कोणी तिला किती उंच आहेस, तर कोणी म्हणत किती बारीक आहेस. तर अनेक लोक तिच्या दातांवर कमेंट्स करून तिची चेष्टा करत. तर काही लोक तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्सवर कमेंट्स करत, तसेच अनेकांनी तिला खूप जास्त मेकअप करतेस म्हणूनही ट्रोल केलं आहे’.
(हे वाचा:ठरलं! सोनमची बहीण करणार लग्न; पाहा कोण आहे अनिल कपूरचा दुसरा जावई )
झीलने व्हिडीओ शेयर करत म्हटलं आहे, ‘मी हे गाणं आधी ऐकायला हवं होतं. मला स्वतःला एक्सेप्ट करण्यासाठी खूपच वेळ लागला. बऱ्याच दिवसानंतर मला हे समजलं की मी जशी आहे तशीचं स्वतःला एक्सेप्ट केलं तर मला अजिबात फरक पडणार नाही की लोक माझ्या बाबतीत काय विचार करतात. जर तुम्ही माझा कॅप्शन वाचत असाल, तर जाऊन आपल्या मित्रांना सांगा की तुम्ही हुशार आहात, स्मार्ट आहात, सुंदर आहात आणि तेसुद्धा नक्कीच तुम्हाला सुंदर समजतील’. सोनू 2008 ते 2012 पर्यंत या मालिकेचा भाग होती. त्यानंतर तिने ही मालिका सोडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.