चाहत्यांना तिचा प्रत्येक लुक खूपच पसंत पडतो. चाहते नियाला भरभरून दाद देत असतात. मात्र असेही काही युजर्स असतात. ज्यांना नियाचा हा अंदाज अजिबात पचनी पडत नाही.आणि म्हणूचं बऱ्याचवेळा निया आपल्या लुकमुळे ट्रोलसुद्धा होतं असते. (हे वाचा: सेटवरचं कोसळली नुसरत भरूचा; शुटींगदरम्यान अभिनेत्रीला अटॅक) नुकताच निया शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती आपल्या नखांना नेलपॉलिश लावताना दिसून येत आहे. यामध्ये नियाने पिंक रंगाचा क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. तसेच नियाच्या जीन्सचं बटनदेखील ओपन आहे. या लुकमध्ये ती खुपचं बोल्ड दिसत आहे. त्यामुळे तिला ट्रोलसुद्धा केलं जातं. यावेळी एका युजरने नको त्या भाषेत नियाला कमेंट केलं आहे. युजरने कमेंट करत म्हटलं आहे, ‘भारतीय संस्कृती विसरलीस का? जे थोडेshe कपडे आहेत. तेही न घालता व्हिडीओ बनव. तू भारतीय संस्कृतीचा अपमान केलंस’ असं या युजर्सने नियाला ट्रोल केलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने ‘जीन्सचं बटन लावायला विसरलीस का?’ असं म्हटलं आहे. ही पहिली वेळ नाहीय याआधीही नियाला कपड्यांवरून वाईट शब्दांत ट्रोल करण्यात आलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actress