मुंबई, 17 जानेवारी : रिअॅलिटी शो बिग बॉस 14 (Bigg Boss 14) च्या सेटवरुन एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमाची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकडचा (Pista Dhakkar) रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ती फक्त 24 वर्षांची होती. बिग बॉस शोची मुख्य असिस्टंट कॉर्डिनेटर असलेली पिस्ता काम संपवून घरी जात असताना फिल्म सिटीच्या रस्त्यावरच हा अपघात झाला.
अपघातापूर्वी गाडी खड्ड्यात पडली!
‘स्पॉटबॉय’ नं दिलेल्या वृत्तानुसार शूटिंग संपवून रात्री पिस्ता तिच्या स्कुटीवरुन घरी परतत होती. त्यावेळी रात्रीच्या अंधारात तिची स्कुटी खड्ड्यांमध्ये पडली. त्यावेळी पाठिमागून येत असलेल्या व्हॅनिटी व्हॅननं पिस्ताला चिरडलं. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला.
View this post on Instagram
अनेक सेलिब्रेटींची श्रद्धांजली!
पिस्ताच्या मृत्यूचा धक्का बसल्याची प्रतिक्रिया अनेक सेलिब्रेटींनी व्यक्त केली आहे. बिग बॉस 13 ची स्पर्धक हिमांशीनं (Himanshi Khurana) सलमान खानसोबतचा फोटो शेअर करत पिस्ताला श्रद्धांजली वाहिली आहे. हिमांशीप्रमाणे बिग बॉसमध्ये यापूर्वी सहभागी झालेल्या सेलिब्रेटींनीही पिस्ताबद्दलच्या त्यांच्या भावना सोशल मीडियावर (Social Media) शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
Such a joyful, vibrant, and a happy soul. You will be missed by everyone who's life you touched #RIP Pista😢🙏🏻
— Shehnaaz Gill (@ishehnaaz_gill) January 16, 2021
पिस्ता ‘बिग बॉस 14’ ची प्रॉडक्शन कंपनी 'एंडमोल शाइन इंडिया'मध्ये काम करत होती. तिनं ‘बिग बॉस’ शिवाय अन्य टीव्ही शो साठी देखील काम केलं आहे. ‘फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी’ आणि ‘द व्हॉईस’ या शो साठी तिनं काम केलं आहे. कांदिवलीमध्ये तिच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.