मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पर्ल व्ही पुरीला जामीन मंजूर; करिश्मा तन्नाने व्यक्त केला आनंद, म्हणाली 'सत्यमेव जयते'

पर्ल व्ही पुरीला जामीन मंजूर; करिश्मा तन्नाने व्यक्त केला आनंद, म्हणाली 'सत्यमेव जयते'

 छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता(Tv Actor)  पर्ल व्ही.पुरीवर (Pearl V. Puri)  एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप लागला आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता(Tv Actor) पर्ल व्ही.पुरीवर (Pearl V. Puri) एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप लागला आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता(Tv Actor) पर्ल व्ही.पुरीवर (Pearl V. Puri) एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप लागला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 जून- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता(Tv Actor)  पर्ल व्ही.पुरीवर (Pearl V. Puri)  एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप लागला आहे. मात्र सध्या पर्लला जामीन मिळाला (Got Bail) आहे. वसई सेशन कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे. गेल्या 11 दिवसांपासून तो अटकेत होता. पर्लला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या सहकलाकार मित्रांनी आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेत्री करिश्मा तन्नाने म्हटलं आहे, ‘मी खूप आनंदी आहे, शेवटी सत्याचाचं विजय झाला’. त्याचबरोबर अभिनेत्री अस्मिता सूदने सुद्धा म्हटलं आहे. ‘पर्लला जामीन मिळाल्याचा मला आनंद आहे’. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत करिश्मा तन्नाने म्हटलं आहे, ‘हे खुपचं चांगलं झालं आहे. मी केवळ सत्यमेव जयते इतकचं म्हणेन. कारण यामध्ये काहीच तथ्य नव्हतं. त्यामुळे पर्लला जामीन मिळणारचं होती’. यावेळी करिश्माला विचारण्यात आलं होतं, की त्याने पर्लशी संवाद साधला का? यावर तिनं म्हटलं की मी त्याच प्रयत्नांत आहे. संध्याकाळी मी त्याच्याशी बोलेन’. करिश्मा तन्नाने एकता कपूरच्या ‘नागिन 3’ मध्ये पर्लसोबत काम केलं आहे.

(हे वाचा: VIDEO: विद्या बालनचं 'मैं शेरनी' गाणं रिलीज; स्त्री शक्तीला केलं अभिवादन )

तसेच ‘फिर भी दिल ना माने’, बदतमीज दिल मधील अभिनेत्री अस्मिता सूदने म्हटलं आहे, मी पहिल्या दिवसापासून यावर एकचं भाष्य केलं आहे. हे खुपचं चांगलं आहे की पर्लला जामीन मिळालं. आत्ता बघूया या की या संपूर्ण प्रकरणाचं नेमकं काय होतं. मला हिचं आशा आहे, की पर्लला या सर्वांशी लढा द्यायची हिम्मत मिळो आणि आणि तो नक्की सिद्ध करेल की तो निर्दोष आहे’. चुकून काही जरी चुकीचं झालं तर संपूर्ण मनोरंजनसृष्टीचं नुकसान होईल. कारण आधीचं या क्षेत्रातील कलाकारांबद्दल लोकांमध्ये विचित्र समज आहे. त्यामुळे तो या प्रकरणात निर्दोष मुक्त झाला तर खुपचं चांगल होईल’.

(हे वाचा: HBD: श्रीदेवीच्या प्रेमात होते मिथुन; पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न? )

पर्ल व्ही.पुरीवर एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ‘पोक्सो’ अंतर्गत त्याला अटक केली होती. मीडिया रिपोर्टनुसार पर्लचे वकील जितेश अग्रवाल यांनी पर्लच्या जामीनबद्दल माहिती दिली आहे.

First published:

Tags: Entertainment, Tv actor