'पाठक बाईचा' रावडी अंदाज; अक्षयाचा भन्नाट VIDEO होतोय VIRAL

'पाठक बाईचा' रावडी अंदाज; अक्षयाचा भन्नाट VIDEO होतोय VIRAL

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली होती. यातील राणा आणि अंजली म्हणजेच पाठक बाईची जोडी खुपचं प्रसिद्ध झाली होती.

  • Share this:

मुंबई, 23 जून- ‘पाठक बाई’ (Pathak Bai)  अर्थातच अक्षया देवधर (Akshaya Devdhar) आपल्या सर्वांचीच लाडकी बनली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली होती. यातील राणा आणि अंजली म्हणजेच पाठक बाईची जोडी खुपचं प्रसिद्ध झाली होती. या मालिकेने काही महीन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र तरीसुद्धा मालिकेच्या कलाकारांची क्रेझ अजूनही कायम आहे. हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. नुकताच अक्षयाने एक व्हिडीओ शेयर (Viral Video) केला आहे. यामध्ये ती एकदम रावडी अंदाजात बाईक राईड करताना दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अभिनेत्री अक्षया देवधरने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती चक्क रावडी अंदाजात रॉयल इनफिल्डवरून बाईक राईड करत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत अक्षयाने ‘मीट नेत्रा’ असं म्हटलं आहे. अक्षया लवकरच आपल्या साठी एक ऑडीओ स्टोरी घेऊन येत आहे. सायली केदार लिखित ही कथा आपल्याला अक्षया देवधरच्या आवाजात स्टोरी टेल मराठीवर ऐकायला मिळणार आहे. कॉलेजच्या विविध झोलवर आधारित असलेल्या या कथेच नाव ‘झोलर’ असं आहे. यामध्ये अक्षयाने आवाज दिलेलं नेत्रा हे अगदी रावडी पात्र आहे.

(हे वाचा: 'या' अभिनेत्री डब्बू रत्नानींच्या कॅलेंडरसाठी झाल्या होत्या 'टॉपलेस', पाहा PHOTO  )

अक्षयाने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली आहे. नुकताच अक्षयाने शेयर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत आहेत. अक्षयाचा हा नवा अंदाज चाहत्यांना फारचं भावला आहे. त्यामुळे चाहते तिचं भरभरून कौतुक करत आहेत. अक्षया छोट्या पडद्यापासून दूर असली तरी निरनिराळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात आहे.

Published by: Aiman Desai
First published: June 23, 2021, 1:20 PM IST

ताज्या बातम्या