मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ओळखलं का या अभिनेत्रीला? हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये आहे लोकप्रिय

ओळखलं का या अभिनेत्रीला? हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये आहे लोकप्रिय

फोटोतील या गोंडस मुलीने हिंदी मालिकेमधून( Hindi Serial)  आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

फोटोतील या गोंडस मुलीने हिंदी मालिकेमधून( Hindi Serial) आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

फोटोतील या गोंडस मुलीने हिंदी मालिकेमधून( Hindi Serial) आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 जून-  फोटोतील या गोंडस मुलीने हिंदी मालिकेमधून( Hindi Serial)  आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. मात्र आज ती मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री (Marathi Actress) म्हणून नावारूपाला आली आहे. अभिनेत्रीच्या निखळ हास्याचे अनेक चाहतेसुद्धा आहेत. स्वप्नील जोशी ते वैभव तत्ववादी अशा अनेक मोठ्या कलाकारांसोबत ती झळकली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून प्रार्थना बेहरे(Prarthna Behare) आहे.

मूळची गुजरातची असणारी प्रार्थना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री बनली आहे. प्रार्थनाने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यामध्ये तिन अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडेच्या छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिच्या वैशाली या व्यक्तिरेखेला चांगलीच प्रसिद्धीही मिळाली होती. आजही बरेच लोक तिला याच नावने ओळखतात.

प्रार्थनाने या मालिकेनंतर आपला मोर्चा मराठी चित्रपटांकडे वळवला होता. ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटातून तिने मराठीमध्ये पदार्पण केल होतं. या चित्रपटात प्रार्थनाने एका पंजाबी मुलीची भूमिका साकारली होती. तर तिच्यासोबत सह अभिनेता म्हणून अभिजीत खांडकेकर होता. त्यांनतर प्रार्थनाने वैभव तत्ववादी सोबत कॉफी आणि बरच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, स्वप्नील जोशी सोबत मितवा, पुष्कर जोगसोबत ती एंड ती अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे.  प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती सतत आपल्या पोस्टच्या माध्यामतून चाहत्यांच्या संपर्कात असते. अलीकडे ती आपल्या चित्रकलेचा छंद जपतानासुद्धा दिसून येत आहे.

(हे वाचा: श्वेता तिवारीच्या मुलीचं Insta Comeback, लवकरच होणार आहे बॉलिवूडमध्ये एंट्री  )

प्रार्थनाच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने लेखक, दिग्दर्शक आणि साउथचा प्रसिद्ध डीस्ट्रीब्यूटर अभिषेक जावकरसोबत लग्न केल आहे. प्रार्थना आणि अभिषेकचं लग्न होण्यापूर्वी ते खूपच चांगले मित्र होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि नंतर लग्नदेखील केल. तसेच प्रार्थनाने मालिका आणि चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी छोट्या मोठ्या जाहिरातींमध्ये सुद्धा काम केल आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment