• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अबब! विजयने तर थलाइवा रजनीकांतलाही टाकलं मागे; एका चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' कोटी मानधन

अबब! विजयने तर थलाइवा रजनीकांतलाही टाकलं मागे; एका चित्रपटासाठी घेतलं 'इतकं' कोटी मानधन

'मास्टर' फेम अभिनेता विजयची लोकप्रियता खुपचं जास्त आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 जून-  दाक्षिणात्य (South Actor)  कलाकरांना खुपचं लोकप्रियता मिळत असते. दक्षिणात्य लोक या कलाकारांना अक्षरशः डोक्यावर घेतात. आणि म्हणूनचं त्यांच्या प्रत्येक चित्रपटांना हाउसफुलची पावती मिळत असते. असाच एक दक्षिणात्य स्टार आहे ज्याची लोकप्रियता खुपचं मोठी आहे. हा अभिनेता म्हणजे विजय(Vijay) होय. विजय दक्षिणेकडे खुपचं प्रसिद्ध अभिनेता आहे. इतकचं नव्हे तर सध्या तो सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेतासुद्धा बनला आहे. असं म्हटलं जात आहे, की विजयने आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी खुपचं मोठी रक्कम घेतली आहे. अभिनेता विजय आगामी काळात दक्षिणात्य दिग्दर्शक वामसी पैदिपल्ली यांच्या चित्रपटात झळकणार आहे. याचं पार्श्वभूमीवर आधारित कोईमोईच्या रिपोर्टनुसार विजयने ‘थलापथी 65’ या चित्रपटासाठी त्याने ही मोठी रक्कम घेतली आहे. विजयने सन पिक्चर्सकडून करोडो रुपये घेतल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयने तब्बल 100 कोटी रुपयांचं मानधन आकारल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. (हे वाचा:गालाच्या खळीनेचं घेतली विकेट'; वाचा सचिन-सुप्रियाची धम्माल Love Story  ) अभिनेता विजय हा फक्त दाक्षिणात्यचं नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्याचे ट्वीटरवर सुद्धा मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. विजयने जर या चित्रपटासाठी खरचं 100 कोटी रुपये मानधन घेतलं असेल, तर तो इतकी रक्कम घेणारा एकमेव दक्षिणात्य अभिनेता ठरणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तो सुपरस्टार रजनीकांत यांनासुद्धा मागे सोडणार. कारण यापूर्वी फक्त रजनीकांत यांनी ‘दरबार’ या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये आकारले होते.  विजयच्या चित्रपटांबद्दल सांगायाचं झालं तर, काही महिन्यांपूर्वीचं त्याचा ‘मास्टर’ हा चित्रपट रिलीज झाला होता. आणि हा चित्रपट या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा दाक्षिणात्य चित्रपट ठरला होता.
  Published by:Aiman Desai
  First published: