HBD: 'त्याने मला कपडे काढून'...सोनल वेंगुर्लेकरने प्रसिद्ध फोटोग्राफरवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप

सोनलने शास्त्री सिस्टर्स, दिल दोस्ती डान्स, साम, दाम दंड, भेद अशा अनेक मालिकांत काम केलं आहे.

सोनलने शास्त्री सिस्टर्स, दिल दोस्ती डान्स, साम, दाम दंड, भेद अशा अनेक मालिकांत काम केलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 जून-  सन 2018 मध्ये ‘मीटू’ (Me Too) मोहिमेने सर्वांनाचं हादरवून सोडलं होतं. यादरम्यान मनोरंजन सृष्टीतील अनेक दुहेरी चेहरे समोर आले होते. अनेक अभिनेत्रींनी पुढे येत झगमगाटी पलीकडे असणारी एक काळी बाजू सर्वांना दाखवली होती. अनेकांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल धैर्याने आवाज उठवला होता. यातीलचं एक अभिनेत्री म्हणजे सोनल वेंगुर्लेकर (Sonal Vengurlekar) होय. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील त्या धक्कादायक प्रसंगाबद्दल.
    अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा आहे. ती सध्या अनेक मालिकांमधून आपल्याला भेटली असली, तरी तिच्या करीयरच्या सुरुवातील तिच्यासोबत असं काही झालं की त्यामुळे ती पूर्णपणे हादरून गेली होती. 2018 मध्ये ‘मीटू’ चळवळ सुरु होती. या मोहिमेच्या माध्यमातून अनेक स्त्री कलाकारांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला होता. अनेक अभिनेत्रींनी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांवर धक्कादायक आरोप केले होते. अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरने सुद्धा या मोहिमेमध्ये सहभाग घेत आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत वाचा फोडली होती. सोनलने धक्कादायक खुलासा केला होता, सोनलने प्रसिद्ध फोटोग्राफर राजा बजाजवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. एका मुलाखतीदरम्यान सोनलनं सांगितलं होतं, की ज्यावेळी ती या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपड करत होते. तेव्हा तिची भेट अभिनेत्री शीना बजाजचे वडील राजा बजाजसोबत झाली होती. ती पुढे म्हणाली, ‘मला ऑडीशनसाठी बोलवण्यात आलं होतं, त्यावेळी तिथे राजा बजाजसुद्धा आधीपासूनचं हजर होते. त्यांच्याशी संवाद झाला असता त्यांनी मला त्यांच्या मुलीच्या कमाईबद्दल सांगितलं. (हे वाचा:HBD: जेव्हा 4 महिने गायब होता सिद्धार्थ; समोर येत केला होता धक्कादायक खुलासा  ) राजा बजाज यांनी मला काम देण्याची खात्री दिली होती. माझं ऑडीशन इतकं चांगलं झालं नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी मला असिस्टट म्हणून घेतलं. त्यानंतर काही दिवसांनी ते मला एका शुटींगसाठी लोणावळ्याला घेऊन गेले होते. त्यावेळी तेथे माझ्या कुटुंबातील एक व्यक्ती, मॉडेल आणि त्यांची आईसुद्धाझ होती. तेथे त्यांनी मला कपडे बदलण्यास सांगितल. माझी इच्छा नसतानाही मला ते करावं लागलं. मी कपडे बदलायला गेले असता. राजा बजाज माझा पाठीमागून आले होते. त्यांनी मला माझा स्तनांवर लावण्यासाठी एक मलमसुद्धा दिली होती. मात्र मी त्यासाठी विरोध दर्शवला. (हे वाचा: इंजिनीअरिंगमध्ये टॉपर होता सुशांत; पण पहिल्याच 'सेम'ला हॉस्टेलमधून हाकललं ) मात्र त्यांनी माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी तिथून बाहेर पडले. शुटींगदिवशीचं ते माझ्या खोलीत जबरदस्ती आले होते. आणि मला सुपरस्टार करण्यासाठी काही गोष्टी शिकवण्याचा दावा करू लागले. आणि मला माझे कपडे काढून समोर बसायला सांगितल. आणि पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा त्त्यातून सुटून दुसऱ्या खोलीत आले. त्यांच्या पत्नीने तर मला याबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकीचं दिली होती. मी तरीसुद्धा तक्रार दाखल केली होती. आणि बहुतेक यासाठी त्यांना एक दिवस पोलीस स्टेशनमध्येही राहावं लागलं होतं, असं सोनलने म्हटलं होतं. सोनलच्या या धक्कादायक खुलास्याने एकचं खळबळ माजली होती. सोनलने शास्त्री सिस्टर्स, दिल दोस्ती डान्स, साम, दाम दंड, भेद अशा अनेक मालिकांत काम केलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: