मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बलात्कार प्रकरणात निया शर्माने दिला पर्ल व्ही. पुरीला पाठींबा

बलात्कार प्रकरणात निया शर्माने दिला पर्ल व्ही. पुरीला पाठींबा

  ‘नागिन 3’(Nagin 3)  या मालिकेमुळे पर्ल व्ही.पुरी(Pearl V. Puri)  लोकप्रिय झाला होता.

‘नागिन 3’(Nagin 3) या मालिकेमुळे पर्ल व्ही.पुरी(Pearl V. Puri) लोकप्रिय झाला होता.

‘नागिन 3’(Nagin 3) या मालिकेमुळे पर्ल व्ही.पुरी(Pearl V. Puri) लोकप्रिय झाला होता.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 6 जून-   ‘नागिन 3’(Nagin 3)  या मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे पर्ल व्ही.पुरी(Pearl V. Puri)  सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका तरुणीच्या बलात्काराचा आरोप त्याच्यावर लागला आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे सर्वांनाचं धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी पर्ल व्ही पुरीला अटक देखील केली आहे. मात्र आत्ता टीव्ही कलाकार पर्लच्या बाजूने पाठींबा देत पुढे येत आहेत. एकता कपूर, अनिता हसनांदानी सोबतचं आत्ता अभिनेत्री निया शर्माने यामध्ये आपलं मत व्यक्त केल आहे. निया शर्माने पर्लला पाठींबा देत एक पोस्ट शेयर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं म्हटलं आहे, ‘महिला आणि मुलींना एक विनंती आहे. कृपा करून विचार न करता बलात्कार किंवा छेडछाडसारखे गंभीर आरोप एखाद्या व्यक्तीवर लावू नका. कारण यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीचं आयुष्य उध्वस्त होऊ शकत. पर्ल व्ही. पुरी मी तुझ्यासोबत आहे. बलात्कार म्हणजे चेष्टा नाहीय. त्यामुळे कृपा करून या गंभीर विषयाची मस्करी थांबवा. अशा या खोट्या बातम्या लोकांपर्यंत पोहचत आहेत. मात्र खरच ज्या मुली या अत्याचाराला बळी पडत आहेत. त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे’. अशा आशयाची पोस्ट नियाने शेयर केली आहे.
View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

निया व्यतिरिक्त अभिनेत्री सुरभी ज्योतीने सुद्धा पोस्ट लिहिली आहे. सुरभीने पोस्ट लिहित म्हटल आहे, ‘जितक मी पर्ल व्ही. पुरीला ओळखते तो एक खूप चांगला मुलगा आहे. आत्ता मला फक्त सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे. माझ्या मित्रा मी तुझ्या सोबत आहे. मजबूत राहा’. असं सुरभीने म्हटलं आहे. (हे वाचा:‘पर्ल बलात्कार करुच शकत नाही, कारण…’; अनितानं दिला अभिनेत्याला पाठिंबा  ) पर्ल व्ही. पुरी ब्रह्मराक्षस, बेपनाह प्यार, नागिन 3 यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. तसेच तो अनेक म्युझिक अल्बममध्येसुद्धा दिसून आला आहे.
First published:

Tags: Entertainment, Tv actress

पुढील बातम्या