मुंबई, 10 डिसेंबर : कोरोनाच्या (COVID 19) काळात घराबाहेर पडताना मास्क (Mask) आणि बाहेरगावी जाताना कोव्हिड टेस्ट (Covid Test) ही आवश्यक बाब बनली आहे. सिनेमा तसंच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना शूटिंगसाठी अनेकदा बाहेरगावी जावं लागतं. कोणत्याही शूटिंगपूर्वी त्यांची कोव्हिड टेस्ट घेतली जात असून त्यांचे अनुभव या कलाकारांनी नेहमीच फॅन्ससोबत शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर (Social Media) वर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सध्याच्या काळात फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा सोशल मीडिया हे एक मोठं माध्यम असल्यानं उर्वशी अनेक गोष्टी या माध्यमातून फॅन्सशी शेअर करत असते.
उर्वशीनं नुकताच कोरोना टेस्ट करण्याचा तिचा अनुभव फॅन्सशी शेअर केला आहे. याचा व्हिडिओ (Video) तिनं इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओत ग्रीन ड्रेस घातलेली उर्वशी एका सोफ्यावर बसलेली आहे. कोव्हिड टेस्ट घेण्यासाठी तिच्या नाकातील स्वॅब सॅम्पल घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी असलेला कोव्हिड योद्धा पुढे सरकतो. त्यावेळी घाबरलेली उर्वशी मागे सरकते. या सर्व प्रकारानंतर उर्वशीला हसू आवरत नाही, तसंच तो कोव्हिड योद्धा देखील हसू लागतो.
हे वाचा - 20 वर्षाचा मुलगा म्हणतो, सनी लिओनी माझी आई; नक्की आहे तरी काय प्रकरण?
“उर्वशी आरामात. सुरक्षा सर्वप्रथम, हसणे नंतर. माझ्या आरोग्याची काळजी घेणारी व्यक्ती देखील माझ्यावर हसत आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर तिच्या फॅन्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
उर्वशीनं यापूर्वी साडीमध्ये भांगडा करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. उर्वशीचा ‘वो चांद कहां से लाओगी’ हा म्युझिक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने टीव्ही कलाकार मोहसीन खानसोबत काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Corona, Coronavirus